शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

"डॉन को पकडना...", बलात्काराच्या आरोपीनं चक्क पोलिसालाच केला WhatsApp कॉल अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 16:23 IST

पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घरच्यांनी तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.

- मंगेश कराळे

नालासोपारा:- अमिताभ बच्चनच्या डॉन चित्रपटात प्रसिद्ध असलेला "डॉन को पकडणा मुश्किल नही नामुनकीन है" हा डायलॉग बलात्काराच्या आरोपीने चक्क तुळींजच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला व्हाटसअप कॉल करून सुनावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्याच्या एक महिन्यानंतर ४५ वर्षीय आरोपी नराधमाला भाईंदरच्या उत्तन परिसरातून अटक केली आहे. पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घरच्यांनी तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.

१५ वर्षीय पीडित मुलगी घटनेच्या दिवशी कामावरून लोकल ट्रेनने घरी जात होती. त्यावेळी तिच्या प्रियकराने फोन करून वाढदिवस असल्याचे सांगून तू येऊन केक काप असे बोलला. पीडित तरुणी नायगाव रेल्वे स्थानकावर उतरली. त्यानंतर तिचा प्रियकर आला आणि तिला मुंबई अहमदाबाद हायवेवर असलेल्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. सर्व मित्र मैत्रिणीनी मिळून केक कापला आणि एकत्र जेवण केले. सगळे आपापल्या घरी जाऊ लागले. यावेळी तिला प्रियकराने मित्राला त्याच्या कारमधून नालासोपारा येथे सोडण्यास सांगितले. आरोपीने पीडितेला कारमध्ये लिफ्ट देऊन निर्जनस्थळी नेत कारमध्येच जबरदस्तीने बलात्कार केला.

घटनेनंतर पीडितेने कसा तरी तेथून पळ काढला. या घटनेने घाबरलेल्या मुलीने दुसऱ्या दिवशी घरी कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. मुलगी घरातून बेपत्ता असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तुळींज पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी तपास सुरू केला.ही अल्पवयीन मुलगी तिच्या मूळ गावी राजस्थान येथे असल्याची माहिती मिळल्यावर राजस्थानमधूम मुलीला पोलिस ठाण्यात घेऊन आले. ती घरातून का पळून गेली याची चौकशी सुरू केली. मुलीने घडलेली हकीकत सांगितल्यावर ते ऐकून पोलिसही अवाक् झाले. आरोपीने तिला कारमध्ये जबरदस्तीने बसवत असताना तिने ऑटोमॅटिक ऑडिओ रेकॉर्डिंग केले होते. याच ऑडिओ रेकॉर्डिंग आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे तुळींज पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.

आरोपी नेहमी आपला मोबाईल बंद ठेवत होता. गरज पडेल तेव्हा तो इतरांशी नेट कॉलिंगद्वारे संपर्क करायचा. तो गेल्या एक महिन्यापासून पोलिसांशी लपाछपी खेळत होता. त्याच्याकडे राहण्यासाठी एकही जागा नसल्याने तो वारंवार जागा बदलत होता. पोलीस शोध घेत असल्याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांना व्हाट्सअप कॉल करून डॉन पिक्चरचा डायलॉग बोलला आहे. पण एकदा त्याने पत्नीशी संपर्क साधला. तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांना मोबाईल ट्रेसच्या मदतीने माहिती काढून उत्तन परिसरातून अटक केली आहे. धनंजय दुबे उर्फ ​​जय दुबे (४५) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीला वसई न्यायालयात हजर केल्यावर ५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस