शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ज्युनिअरला तरुणीचं चुंबन घेण्यास भाग पाडलं; कॉलेज रॅगिंग प्रकरणी सिनिअर्स ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 15:58 IST

महाविद्यालयाने या घटनेत सहभागी असलेल्या १२ विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले आहे.

नवी दिल्ली- ओडिशामधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीचे बळजबरीने चुंबन घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन अल्पवयीन मुलांसह पाच विद्यार्थ्यांना लैंगिक छळासह अनेक आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले.

गंजम जिल्ह्यातील महाविद्यालयाने या घटनेत सहभागी असलेल्या १२ विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले आहे. तसेच ताब्यात घेतलेल्या पाच विद्यार्थ्यांवर रॅगिंगचा आरोप ठेवण्यात आला आहे आणि मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा आणि आयटी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. 

मिळालेल्या माहितीनूसार, सरकारी महाविद्यालयात एका अल्पवयीन मुलाने प्रवेश घेतला. विद्यालयाच्या पहिल्या वर्षातील या अल्पवयीन विद्यार्थ्याला त्याच्या सिनियर विद्यार्थ्यांनी भडकावले. तसेच, मैदानातील एका अल्पवयीन मुलीला चुंबन घेण्यास भाग पाडले. त्यातून या मुलाने मैदानात जबरदस्तीने चुंबन घेतले, असे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. तसेच सदर घटनेचा सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, बेरहामपूरचे पोलीस अधीक्षक सरबन विवेक एम म्हणाले की, हे फक्त रॅगिंगचे प्रकरण नाही तर मुलीच्या लैंगिक छळाचे प्रकरण आहे. ओडिशाची ही घटना हैद्राबादच्या घटनेच्या आठवड्यानंतर आणि आयआयटी-खरगपूर येथील वसतिगृहाच्या खोलीत एक विद्यार्थी मृतावस्थेत आढळल्यानंतर एक महिन्यानंतर घडली. पोलिसांनी आयआयटी घटनेला आत्महत्येचे प्रकरण म्हटले होतं. मात्र न्यायालयाने हे रॅगिंगचे प्रकरण असू शकते, असं म्हटलं होतं.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळOdishaओदिशाPoliceपोलिस