शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

डॉक्टर पतीला पत्नीचा प्रियकराच्या मदतीने भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न; नाशिकमधील प्रकार

By अझहर शेख | Updated: September 25, 2022 17:00 IST

याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता संशयित महिलेच्या विवाहबाह्य अनैतिक संबंधाची कुणकुण तिचे पती असलेले पिडित डॉक्टरला लागली होती.

नाशिक: अनैतिक संबंधातून डॉक्टर पतीला पत्नीने आपल्या दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने रुग्णालयातील एका खोलीत चक्क भुलीचे इंजेक्शन टोचून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार पिडित डॉक्टरच्या मुलाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर रविवारी (दि.२५) उघडकीस आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, येथील एका खासगी रुग्णालयातील ४५वर्षीय पिडित डॉक्टरला त्याच्या ४०वर्षीय पत्नीने आपल्या जोडीदारासोबत मिळून संगनमताने रुग्णालयात बोलावून घेत तेथे वाद घातला. यावेळी दोघांनी मिळून डॉक्टरला रुग्णालयातील एका खोलीत डांबले. तेथे त्यांना भुलीच्या औषध इंजेक्शनद्वारे देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.डाॅक्टरच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित महिला व तिच्या प्रियकराविरुद्ध म्हसरुळ पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता संशयित महिलेच्या विवाहबाह्य अनैतिक संबंधाची कुणकुण तिचे पती असलेले पिडित डॉक्टरला लागली होती. यामुळे संशयित महिलेने आपल्या जोडीदाराच्या मदतीने त्यांना भुलीचे इंजेक्शन दिल्याचा अंदाज वर्तविण्यात अआला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी उशीरापर्यंत दोघा संशयितांपैकी कोणालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलेले नव्हते. याप्रकरणी अधिक तपास सहायक निरिक्षक अहिरे हे करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी