शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार करून वहिनीस जाळण्याचा प्रयत्न; संशयिताला अटक

By देवेंद्र पाठक | Updated: May 23, 2023 23:15 IST

याप्रकरणी पीडित महिलेने आझादनगर पोलिसात फिर्याद दाखल केली. संशयिताला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले.

धुळे : वहिनीवर अत्याचार करून मध्यरात्रीनंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले. ही थरारक घटना पारोळा रोडवर कृषी महाविद्यालयाजवळील नाल्यात रविवारी रात्री ८ ते सोमवारी पहाटे २:३० वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी पीडित महिलेने आझादनगर पोलिसात फिर्याद दाखल केली. संशयिताला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले.

धुळे तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दिराने आपल्या वहिनीला गावाहून धुळ्याकडे बोलावून घेतले. तिला पारोळा रोडवरील कृषी महाविद्यालयाजवळ असलेल्या नाल्याजवळ नेले. रविवारी रात्री ८ ते सोमवारी पहाटे २:३० वाजेदरम्यान तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर तिला बांधून ठेवले. एवढ्यावरच न थांबता त्या नराधमाने दुचाकीमधील पेट्रोल काढले आणि तिच्या अंगावर टाकून पेटवून दिले. तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. 

या थरारक घटनेनंतर तो नराधम घटनास्थळावरून पसार झाला. पेटल्यानंतर जिवाच्या आकांताने पीडित महिला मदतीसाठी आरडा ओरड करू लागली. आवाज ऐकून कृषी महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच उपाधीक्षक ऋषिकेश रेड्डी, आझादनगर पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 

पोलिसांनी तिला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या पीडित महिलेवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, संशयिताविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी