शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

एक काेटीची रक्कम चाळीस बँक खात्यांत; सिरम इन्स्टिट्यूट फसवणूक प्रकरणी सात अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 16:28 IST

पाेलिसांनी सुतावरून गाठला स्वर्ग...

पुणे : सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांच्या नावे व्हाॅटस्ॲप मेसेज पाठवीत एक कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पाेलिसांनी संगणक अभियंत्यासह बँक कर्मचाऱ्यास अटक केली आहे. विविध राज्यांतून एकूण सात आराेपींना अटक केली आहे. एक काेटीची रक्कम आराेपींनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींच्या बँक खात्यावर पाठविली. त्यानुसार तेरा लाख रुपयांच्या रकमेसह चाळीस बँक खाती गाेठविण्यात आली आहेत. आणखी आराेपींचा शाेध घेत असल्याचे  परिमंडळ दाेनच्या पाेलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.

राजीवकुमार शिवजी प्रसाद,  चंद्रभूषण आनंद सिंग, कन्हैयाकुमार संभू महंतो (तिघे रा. बिहार), रवींद्रकुमार हुबनाथ पटेल (उत्तर प्रदेश), राबी कौशलप्रसाद गुप्ता (रा. मध्य प्रदेश),  यासीर नाझीम खान (रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) आणि प्रसाद सत्यनारायण लोवुडू (रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश)  अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. फायनान्स मॅनेजर सागर कित्तुर यांनी दिलेल्या  फिर्यादीवरून बंडगार्डन पाेलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. मुख्य सूत्रधार फरार असून पाेलिस त्याचा शाेध घेत आहेत.

आदर पूनावाला यांच्या नावे सिरम इन्स्टिट्यूटचे संचालक सतीश देशपांडे यांना ‘मी मिटिंगमध्ये व्यस्त आहे. मला फाेन करू नका. मी पाठविलेल्या आठ बँक खात्यावर तात्काळ रकमा पाठविणे,’  असा मेसेज पाठविण्यात आला हाेता. मेसेजमधील नमूद बँक खात्यावर एक कोटी एक लाख एक हजार रुपये पाठविण्यात आले होते.  दुसऱ्या दिवशी दि. ८ सप्टेंबर राेजी आदर पूनावाला यांनी ताे मेसेज पाठविला नसल्याचे  सांगितल्यानंतर  सिरम कंपनीची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले हाेते.

पाेलिसांनी सुतावरून गाठला स्वर्ग --  आरोपींनी वापरलेल्या माेबाइल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण आणि टॉवर लोकेशन काढण्यात आले. -  त्यामध्ये एका सीम कार्डवर १९ आयएमईआय क्रमांक मिळाले. -  त्यातील एक क्रमांक आणि माेबाइल बिहार राज्यात वापरात असल्याचे दिसून आले. -  त्यावरून बंडगार्डन पाेलिस पथकाने बिहार राज्यात चंद्रभूषण सिंह याला ताब्यात घेतले.  त्यानंतर ६ आराेपींना अटक केली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज