शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

पालघरमध्ये १८ वर्षीय मुलीची भरदिवसा गळा चिरून हत्या, संशयित फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 16:51 IST

या घटनेमुळे पुन्हा एकदा आश्रमशाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- हुसेन मेमन

जव्हार : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा मोखाडा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. मोखाडा शहरात शुक्रवारी भरदिवसा एका आश्रमशाळेत शिकणाऱ्या अर्चना उदार ( वय १८) या मुलीची अज्ञाताने कोयत्याने गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली. त्यामुळे तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा आश्रमशाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्राथमिक तपासादरम्यान ही घटना प्रेमप्रकरणातून झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, संशयित आरोपी प्रभाकर वाघेरे (वय २२) फरार झाला असून मोखाडा पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे पुढील तपास करीत आहेत. आश्रमशाळेत वर्गखोल्या कमी असल्याने या आश्रमशाळेपासून ५०० ते ६०० मीटर लांब असलेल्या महाविद्यालयात येथील ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना दररोज चालत नेण्यात येते. 

अशावेळी शिक्षक या मुलांसोबत असतात. मात्र, आज सकाळी मुली वर्ग संपवून जेवण्यासाठी पुन्हा महाविद्यालयाकडून आश्रमशाळेकडे जात होते. त्यावेळी निर्मनुष्य असलेल्या कब्रस्तानाच्या पाठीमागेच प्रभाकर याने अर्चना हिला गाठले आणि धारदार कोयत्याने गळा चिरून हत्या केली. यावेळी तिच्या मैत्रीणीनी घाबरून आरडाओरडा केला. मात्र, काही लोक मदतीला धावण्याआधीच प्रभाकरने तिथून पळ काढला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpalgharपालघर