शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमूलच्या कर्मचाऱ्याने कंपनीचीच केली 4 कोटींची फसवणूक, गुन्हा दाखल; जाणून घ्या कसा झाला खुलासा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 12:56 IST

Employee creates dummy firm, milks Amul of Rs 4 crore : ही बाब उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अहमदाबाद : दूध व्यवसायातील देशातील आघाडीच्या कंपनी 'अमूल'ची  4 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही फसवणूक कंपनीतील एका कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह केली आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अहमदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (GCMMF or Amul) महाव्यवस्थापक अनिल बायती यांनी बुधवारी ही तक्रार दाखल केली आहे. ऑडिटदरम्यान ही फसवणूक (Fraud) उघडकीस आल्याचे सांगण्यात आले. एमयू ट्रान्सपोर्ट कंपनीने मूळ बिलांच्या डुप्लिकेट प्रतींच्या आधारे अमूलकडून 4.02 कोटी रुपयांचे पेमेंट मिळवल्याचे आढळून आले.

मिति व्यास यांच्या नावावर एमयू ट्रान्सपोर्ट नोंदणीकृत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मित्ती ही उज्ज्वल व्यास यांची पत्नी आहे आणि उज्ज्वल हे अमूलच्या फ्रेश प्रोडक्ट डिपार्टमेंटमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहेत. उज्ज्वल व्यास यांनी आपल्या पत्नीसह 2010 ते 2022 या 12 वर्षांत ही फसवणूक केली. अमूलच्या नियमांनुसार कंपनीचे कर्मचारी किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक कंपनीसोबत कोणताही व्यवसाय करू शकत नाहीत, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अशाप्रकारे उज्ज्वल व्यास यांनी कंपनीच्या नियमांचेही उल्लंघन केले आहे.

पोलिसांकडून कारवाई सुरूआरोपी उज्ज्वल व्यास यांनी आपला गुन्हा कबूल केल्याचे म्हटले जात आहे. उज्ज्वल व्यास यांनी पत्नीच्या नावावर बनावट कंपनीची नोंदणी केल्याचे समजते. त्यानंतर 2010 ते 2022 या कालावधीत त्या बनावट कंपनीचे माध्यम बनवून पत्नीच्या खात्यात जवळपास साडेचार कोटी रुपये जमा केले. दरम्यान, याप्रकरणी गुजरात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक), 471 (प्रत्यक्ष बिलांमध्ये छेडछाड) आणि 120 बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी