शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात

By प्रदीप भाकरे | Updated: July 14, 2025 00:14 IST

अमरावतीच्या शंकर नगर परिसरात पोलिसांची धाड

प्रदीप भाकरे, अमरावती: येथील शंकर नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेली तरुणाईची मद्य पार्टी गुन्हे शाखा युनिट दोनने उधळली. १३ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शंभर ते दीडशे तरुण-तरुणींना यावेळी ताब्यात घेतले. यामध्ये बहुतांश अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश आहे. त्या हॉटेलमध्ये फेक मॅरेज इव्हेंट या पाच दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

फेक मॅरेज ट्रेंड म्हणजे काय? तरूणाईमध्ये वाढलीये भलतीच क्रेझ

कशी केली कारवाई?

फेक मॅरेज इव्हेंट पार्टीमध्ये काही अल्पवयीन मुला-मुलींना दारू सर्व्ह केली जात आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट २ ला मिळाली होती. त्यानुसार रविवारी रात्री ९च्या सुमारास तेथे धाड टाकण्यात आली. १८ वर्षाखालील मुला-मुलींना पिण्यासाठी दारू दिली जात असल्यामुळे संबंधित हॉटेल मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. उशिरा रात्री १२ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.

गुन्हे शाखा युनिट टूचे प्रमुख संदीप चव्हाण व एपीआय महेश कुमार इंगोले यांच्या पथकाने ही धाड टाकली. अल्पवयीन मुला-मुलींची संख्या नेमकी किती, हे जाणून घेण्यासाठी सर्वांची नावे व वय तपासले जात आहेत. १८ वर्षाखालील मुलामुलींना बारमध्ये दारू देणे व पुरवणे कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असून संबंधित हॉटेल मालकावर कारवाई करण्यात येत आहे. वृत्त लिहोस्तोवर ती कारवाईची प्रक्रिया सुरू होती. हॉटेल मालक, आयोजकांसह त्या तरुण-तरुणींना राजापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसraidधाडAmravatiअमरावतीliquor banदारूबंदी