शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती मारहाण प्रकरण: ठाणेदाराची तडकाफडकी बदली, दोन अंमलदार निलंबित

By प्रदीप भाकरे | Updated: November 12, 2022 19:16 IST

हॉस्पिटलमधून आरोपी पळून गेल्याने करण्यात आली कारवाई

अमरावती: आठ दिवसांपूर्वी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ला चढवला होता. यातील एक आरोपी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. दरम्यान गंभीर गुन्हा दाखल असल्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पोलिसांची तैनाती करण्यात आली होती. मात्र हा आरोपी शुक्रवारी रुग्णालयातून पळून गेला. या प्रकरणी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शनिवारी फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर यांची तडाकफडकी बदली केली असून दोन पोलिसांना निलंबित केले आहे. फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर यांची बदली विशेष शाखेला केली असून फ्रेजरपुराचे नविन ठाणेदार म्हणून विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांना जबाबदारी दिली आहे. तसेच फ्रेजरपुरा ठाण्यातील पोलीस अंमलदार नईम बेग व संजय डेरे या दोन अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे.

नितीन ऊर्फ बबलू भगवंत गाढे (३६, रा. यशोदानगर) असे रुग्णालयातून परस्पर निघून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. ६ नोव्हेंबरला सांयकाळी यशोदानगर परिसरातील एका वाईन शॉपीवर बबलू गाढे व गोलू चौधरी या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर दोघांनीही एकमेकांवर चाकू हल्ला चढवला होता. त्यामुळे पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरुन दोघांवरही प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या हल्ल्यात बबलूच्या पोटात चाकू लागला होता. त्यामुळे त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मागील पाच दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू असल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती मात्र प्रकरण गंभीर असल्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांनी या खासगी रुग्णालयात त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पोलिस अंमलदार तैनात केले होते. असे असतानाही बबलू गाढे शुक्रवारी सांयकाळी रुग्णालयातून पसार झाला. या प्रकरणाची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेवून ठाणेदारांची बदली करुन दोन अंमलदारांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिसTransferबदलीsuspensionनिलंबन