शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

साधूच्या वेशातील इसमाच्या खून प्रकरणातील संशयित अमजद अट्टल गुन्हेगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 21:36 IST

मडगाव पोलिसांनी खून प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर आता मंगळुरु पोलिसही त्याला चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत.

मडगाव: साधुच्या वेशातील एका इसमाच्या खून प्रकरणी गोव्यातील मडगाव पोलिसांनी मुसक्या आवळलेला अमजद खान उर्फ निग्रो (२१) हा अटटल गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले आहे. कर्नाटातील मंगळुरु येथील सुलिया पोलीस ठाण्यातील तुरुगांतून त्याने यापुर्वी पलायन केले होते. तेथील पोलीस त्याच्या मागावर असून, तो तेथे वॉंटेन्ड आहे. मडगाव पोलिसांनी खून प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर आता मंगळुरु पोलिसही त्याला चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे. सदया अमजद खून प्रकरणी मडगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे.मागच्या मंगळवारी मंगळवारी रात्री मालभाट येथील यल्लम्मा घुमटीजवळ खुनाची एक घटना घडली होती.दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी तेथे साधुच्या वेशातील एक इसम मृतावस्थेत सापडला होता. मृतदेहाजवळ दारुची एक बाटलीही सापडली होती. खून म्हणून मडगाव पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले होते.सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास सुरु केला असता, एका युवकाने मयताच्या डोके दगडाने चेपल्याने हा खून झाल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी तपास चालू करुन मागच्या आठवडयाच्या शुक्रवारी रात्री संशयित अमजद याला पकडले होते. त्याने आपल्या गुन्हयाची कबुली दिली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.संशयिताला पैसे पाहिजे होते. पहाटे साडेचारच्या दरम्यान तो फिरत यल्लम्मा घुमटीजवळ पोहचला असता, तेथे त्याला साधुच्या वेशात एक इसम सापडला, त्याच्याकडे पैसे मागितले असता, त्याने नकार दिला. नंतर चिडून त्याने दगडाने त्याचे डोके चेपले व पैसे घेउन तो पळून गेला होता. संशयिताला व्हायटनर द्रव्य हुगंण्याचे व्यसन होते. व्यसानासाठी पैसे पाहिजे असल्याने त्याने खून केला होता. शुक्रवारी रात्री तो मडगावच्या कोकण रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर रेल्वेतून गावी जाण्यासाठी आला असता, एलआयबी पोलीस पथकाचे पोलीस गोरखनाथ गावस यांनी त्याला पकडले होते.अमजद हा गोव्यातील मडगाव व वास्को येथील रेल्वे स्थानकावर रहात होता असेही तपासात उघड झाले आहे.दरम्यान या खून प्रकरणातील मयताची ओळख अजूनही पटू शकली नाही. मृतदेह गोवा वैदयकीय महाविदयालय इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलीस तपास चालू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा