शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बिग बींचा सुरक्षारक्षक पोलीस करोडपती; विश्वासातील असल्याने बदली न होण्यासाठी दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 09:25 IST

कमाईच्या चर्चेनंतर डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात बदली : पत्नीच्या नावे सिक्युरीटी एजन्सी 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे यांची डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांची वर्षाची कमाई दीड कोटीच्या घरात असल्याच्या चर्चेनंतर रातोरात ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडून त्यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील बड्या व्यक्तींना व सेलिब्रिटींना आवश्यकतेनुसार पोलीस सुरक्षा पुरवली जाते. अमिताभ बच्चन यांना एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. दोन हवालदार सतत त्यांच्यासोबत असतात. शिंदे हे त्यापैकी एक आहेत. शिंदे हे २०१५ पासून अमिताभ यांच्या सुरक्षेत होते. 

त्यांची वार्षिक कमाई दीड कोटीच्या घरात असल्याच्या चर्चेनंतर गुरुवारी रात्री त्यांची डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. ते अमिताभ यांच्या जास्त विश्वासातले होते. त्यामुळे बदली होऊ नये म्हणूनदेखील बराच दबाव आणण्याचाही प्रयत्न करण्यात आला. शिंदे यांच्या पत्नीच्या नावावर खासगी सिक्युरीटी एजन्सी आहे. याअंतर्गत बॉलीवूडमधील सेलिब्रिटींना तसेच नेतेमंडळींना सुरक्षा पुरविण्यात येत आहे. या एजन्सीद्वारे त्यांना पैसे येत होते का, याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते. तर दुसरीकडे कुठल्याही पोलीस हवालदाराला पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी ड्युटी लावली जाऊ नये, अशा सूचना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिल्या आहेत. त्यातून ही बदली झाल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.

...तर कारवाई होऊ शकतेनियमानुसार कुठलाही सरकारी कर्मचारी दोन ठिकाणांहून पगार घेऊ शकत नाही. शिंदे यांनी या नियमाचा भंग केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. सुरुवातीला त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून याबाबत माहिती घेण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने नमूद केले.

पोलीस ठाण्यात झाले हजरबदलीच्या आदेशानंतर शिंदे हे शुक्रवारी डी.बी मार्ग पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनPoliceपोलिस