शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गायकवाड म्हणतो, ७ वर्षांत पहिल्यांदाच घेतली लाच! सेवापुस्तिका ताब्यात; पाच तास झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 06:54 IST

गायकवाड सात वर्षांपूर्वी सहायक अभियंता म्हणून रुजू झाला. त्याच्या घराच्या झडतीत रोख सापडली नाही. सात वर्षांत पहिल्यांदाच लाच घेतली, असे तो म्हणतो. 

अहमदनगर : खळबळ उडवून देणाऱ्या एक कोटीच्या लाचप्रकरणी एसीबीने सोमवारी नगर  व धुळे एमआयडीसीत  छापे मारत झाडाझडती घेतली.  पथकाने लाचखोर अमित गायकवाड व गणेश वाघ (फरार) यांच्या सेवापुस्तिकांसह महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. गायकवाड सात वर्षांपूर्वी सहायक अभियंता म्हणून रुजू झाला. त्याच्या घराच्या झडतीत रोख सापडली नाही. सात वर्षांत पहिल्यांदाच लाच घेतली, असे तो म्हणतो. 

नगर, धुळे एमआयडीसी कार्यालयांवर छापेतीन पथके मुख्य सूत्रधार उपअभियंता गणेश वाघ याचा शोध घेत आहेत. नगर व धुळे अशा दोन्ही कार्यालयांची तपासणी झाली. गायकवाडच्या नागापूर एमआयडीसी कार्यालयात पाच तास तपासणी सुरू होती. 

गायकवाडला जामीन; वाघचा अटकपूर्वसाठी अर्जआरोपी अमित किशोर गायकवाड (रा. आनंदविहार, नागापूर) याला जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांनी सोमवारी जामीन मंजूर केला तसेच उपअभियंता वाघ यानेही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी