शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

अमेरिका ते न्यूझीलंड...व्हाया नागपूर; ड्रग्ज तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, पाच कोटींचे ड्रग्ज पार्सल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 06:36 IST

पाच कोटींचे ड्रग्ज पार्सल जप्त

मुंबई : पोलिसांनी केलेल्या कारवाईतून ड्रग्ज तस्करीचे नागपूर कनेक्शन समोर आले असतानाच, अमली पदार्थ नियंत्रक पथकाच्या (एनसीबी) कारवाईतून पुन्हा एकदा नागपूरचे ड्रग्ज तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झाले आहे. अमेरिका, न्यूझीलंड ते नागपूरला कुरिअरद्वारे निघालेले कोट्यवधींचे ड्रग्ज पार्सल जप्त करण्यास एनसीबीला यश आले आहे. गेले ६ दिवस सुरू असलेल्या कारवाईअंती एनसीबीच्या पथकाने धडक कारवाई केली.  जवळपास ५ कोटींचे ड्रग्ज जप्त करत तीनजणांना ताब्यात घेतले आहे. 

एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक अमित घावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने सलग ६ दिवस राबविलेल्या ३ ऑपरेशनअंतर्गत ४.५९० किलो मेथाक्वॅलोन, ८७० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, ८८ किलो उच्च प्रतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळपास ५ कोटी आहे. यामध्ये मुंबईच्या फॉरेन पोस्ट ऑफिस येथून हायड्रोपिनिक गांजाचे पार्सल जप्त करण्यात आले.  

हे पार्सल अमेरिका येथून नागपूरला जाणार होते. त्यापाठोपाठ दुसऱ्या कारवाईत जप्त करण्यात आलेले मेथाक्वॅलोनचा साठा हा नागपूर येथून न्यूझीलंडला जाणार असल्याची माहिती  तपासात समोर आली. पोळपाटात हे ड्रग्ज लपविण्यात आले होते.  या दोन्ही कारवाईत नागपूरचे ड्रग्ज तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आल्यामुळे पुढील  तपासासाठी एक पथक नागपूरला रवाना झाले आहे.

८८ किलो गांजा जप्त

त्यापाठोपाठ कर्जत येथून मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी होणार असल्याच्या माहितीने पथकाने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचून संशयित वाहन अडवले.वाहनाच्या टायर, दरवाजामध्ये लपवून ठेवलेला ८८ किलो गांजा जप्त करण्यास पथकाला यश आले. हा गांजा तस्करीसाठी मुंबईत येणार होता. त्यापूर्वीच पथकाने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. गेल्या ४ वर्षांपासून ते ड्रग्ज तस्करी करत असल्याची माहिती चौकशीत उघड झाली. प्रत्येक फेरीदरम्यान वाहनांबरोबर त्याचा वाहन क्रमांक बदलून ते ड्रग्जची तस्करी करत होते. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोInternationalआंतरराष्ट्रीयnagpurनागपूर