शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांतरप्रकरणी आरोपीला ट्रान्झिट रिमांड, योग्य सुरक्षा देण्याचेही निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 08:39 IST

मुंब्रा आणि परिसरातील ४०० तरुणांचे कथित ऑनलाइन धर्मांतर केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुंब्रा आणि परिसरातील ४०० तरुणांचे कथित ऑनलाइन धर्मांतर केल्याचा आरोप असलेल्या बद्दो ऊर्फ शाहनवाज खान (२३) याला ठाणे ते गाझियाबाद नेण्यासाठीची तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड ठाणे न्यायालयाने सोमवारी दिली. अलिबागमधून ताब्यात घेतल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी त्याला रविवारी अटक केली होती.

पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, निरीक्षक माधुरी जाधव, बाबासाहेब निकम आणि सहायक पोलिस निरीक्षक अजय कुंभार, तसेच गाझियाबादच्या कवीनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास अग्निहोत्री आणि सहदेव सिंग आदींच्या पथकाने त्याला ११ जूनला अलिबागमधील एका फार्म हाउसमधून ताब्यात घेतले होते. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याची मुंब्रा येथे वैद्यकीय तपासणीही करण्यात आली होती. त्याच्यावरील ऑनलाइन धर्मांतराच्या आरोपाची पडताळणी, त्याच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे किंवा कसे ? अशा अनेक बाबींचा तपास करायचा असल्याची माहिती ठाणे आणि गाझियाबाद पोलिसांनी सोमवारी ठाणे न्यायालयात दिली. त्यासाठी ठाणे ते गाझियाबादला नेण्यासाठी त्याच्या ट्रान्झिट कोठडीची मागणी करण्यात आली हाेती.

योग्य सुरक्षा देण्याचेही निर्देश

  • न्यायालयाने ही मागणी मान्य करतानाच त्याला योग्य ती सुरक्षा पुरविण्याचेही आदेश पोलिसांना दिले. 
  • त्यानुसार महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत ठाणे पोलिसांनी प्रवासादरम्यान त्याला सुरक्षा पुरविली होती. 
  • त्याच्या गाझियाबाद येथील घरातून पोलिसांनी काही इलेक्ट्रिक उपकरणेही हस्तगत केली असून त्याच्याकडे आता गाझियाबादचे पोलिस पथक कसून चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी