शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'या' अभिनेत्रीच्या पतीचे ८ कोटी लुटणाऱ्या कुख्यात गुंडाचा पोलिसांनी केला एन्काउंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 19:42 IST

गुंड शक्ती नायडूची माहिती देणाऱ्या दिल्ली आणि मेरठ पोलिसांनी प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

ठळक मुद्देशक्ती नायडू यांची मंगळवारी कांकरखेडा येथील वैष्णो धाम कॉलनी येथे चकमकीत मेरठ पोलिसांनी गोळ्या घालून खात्मा केला. नायडूने पॅरोलवर सुटल्यानंतर स्पेशल सेल, दिल्लीचे एसीपी ललित मोहन नेगीची हत्या कट रचत होता.

मेरठ - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांच्याकडून ८ कोटींची लूट करणाऱ्या कुख्यात गुंडाचा मेरठ पोलिसांनी चकमकीत गोळ्या घालून खात्मा केला आहे. गुंड शक्ती नायडूची माहिती देणाऱ्या दिल्ली आणि मेरठ पोलिसांनी प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.दिल्लीचा कुख्यात गुंड असलेल्या शक्ती नायडू यांची मंगळवारी कांकरखेडा येथील वैष्णो धाम कॉलनी येथे चकमकीत मेरठ पोलिसांनी गोळ्या घालून खात्मा केला. या दरम्यान सीओ दौराला यांच्या पोटाला गोळी लागली. एक गोळी एसएसपीच्या बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये जाऊन अडकली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री विशाल चौधरी येथील लावड़च्या चिंदौड़ी गावात सरधना येथे काही गिनदांनी फॉर्च्युनर गाडी चोरली होती. मंगळवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास खबऱ्याने सीओ दौराला जितेंद्र सरगम यांना माहिती दिली की, फॉर्च्युनर गाडी वैष्णो धाम कॉलनीतील घराच्या बाहेर उभी आहे.

अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांच्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील  मदनगीर येथे राहणारा नायडू हाच याप्रकरणी दरोडेखोर असल्याची ओळख पटली होती. यावर मेरठ झोन आणि दिल्लीकडून प्रत्येकी १ - १ लाख असे बक्षीस होते. ३१ जानेवारी रोजी नायडूने त्याच्या टोळीचा साथीदार आणि दिल्लीचा रहिवासी असलेल्या हनीला गोळ्या घालून हत्या केली. हनीचे काका टिळकराज यांना पाच गोळ्या लागल्या.त्याचवेळी दिल्लीच्या कोर्टात शिपायाची हत्या करण्याव्यतिरिक्त अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांनी आठ कोटींची लूट केली होती. दिल्ली पोलिसांनी नायडू यांच्यावर मोक्का लावला होता. नायडूने पॅरोलवर सुटल्यानंतर स्पेशल सेल, दिल्लीचे एसीपी ललित मोहन नेगीची हत्या कट रचत होता. 

टॅग्स :PoliceपोलिसShilpa Shettyशिल्पा शेट्टीRobberyचोरीDacoityदरोडा