शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कथित बिल्डर मित्राने केली दगाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 21:06 IST

एका प्राध्यापिकेशी ऑनलाईन मैत्री करत तिचा विश्वास संपादन करणाऱ्या एका कथित बिल्डरने तिच्याकडून ६४ हजार रुपये लंपास केले.

ठळक मुद्देप्राध्यापिकेची फसवणूक : ६४ हजार लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका प्राध्यापिकेशी ऑनलाईन मैत्री करत तिचा विश्वास संपादन करणाऱ्या एका कथित बिल्डरने तिच्याकडून ६४ हजार रुपये लंपास केले. तीन दिवसात पैसे परत करण्याची थाप मारणारा आरोपी दोन महिने होऊनही रक्कम परत करत नसल्याचे पाहून प्राध्यापिकेने त्याची पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर तो बिल्डर नाही तर थापेबाज असल्याचे उघड झाले.प्रणय दत्तराम नारनवरे असे आरोपीचे नाव आहे. मूळची वर्धा आणि सध्या नागपुरातील ओमकारनगरात राहणारी रोशनी (वय २९) एका महाविद्यालयात नोकरी करते. तिच्यासोबत आरोपीची गेल्या वर्षी जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर भेट झाली. दोघांचा नंतर ऑनलाईन संपर्क वाढला. नारनवरे स्वत:ला बिल्डर असल्याचे सांगत होता. सातत्याने संपर्क होत असल्याने या दोघांमध्ये मैत्री झाली. दरम्यान, रोशनीचा विश्वास संपादन करणाऱ्या नारनवरेने २८ नोव्हेंबर २०१९ ला अचानक रोशनीला फोन करून ६४ हजाराची गरज असल्याचे सांगितले. तीन दिवसात रक्कम परत करेन, असेही तो म्हणाला. त्यानुसार रोशनीने आधी ३० हजार ऑनलाईन ट्रान्सफर केले, नंतर पुन्हा ३४ हजार पाठविले. काही दिवसानंतर रोशनीने त्याला पैसे परत मागितले असता आरोपी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. दोन महिने होऊनही तो रक्कम परत करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने रोशनीला संशय आला. तिने त्याच्याबाबत माहिती काढली असता तो बिल्डर नसून थापेबाज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रोशनीने अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली नारनवरेविरुद्ध गुन्हा दाखल केला. एपीआय संतोष जाधव पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी