शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम फोडल्याप्रकरणी चौघांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 21:07 IST

Crime News : १२ हजाराचा दंड : उदगीर न्यायालयाचा निकाल

ठळक मुद्देपोलिसांनी सांगितले, २३ जुलै २०२० रोजी शहर पोलीस ठाण्याचे अहमद पठाण व महेश मुसळे यांचे गस्त पथक नाईक चौकातून जात होते.

उदगीर (जि. लातूर) : शहरातील वसंतराव नाईक चौकात असलेले स्टेट बँकेचे एटीएम फोडल्याप्रकरणी उदगीर न्यायालयाने चौघांना दोन वर्ष तीन महिने कारावासाची शिक्षा मंगळवारी ठोठावली. शिवाय, प्रत्येकी १२ हजारांचा दंडही सुनावला आहे.

पोलिसांनी सांगितले, २३ जुलै २०२० रोजी शहर पोलीस ठाण्याचे अहमद पठाण व महेश मुसळे यांचे गस्त पथक नाईक चौकातून जात होते. तेव्हा तेथील स्टेट बँकेचे एटीएमची मशीन फोडत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरोपीस रंगेहात पकडले. तेव्हा त्याचे तीन साथीदार पसार झाले. हा गुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे त्याची ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्थागुशाचे नामदेव सारूळे, चंद्रकांत कलमे, तुळशीराम बरुरे, राहुल गायकवाड, दयाराम सूर्यवंशी यांनी तीन तासांत पळून गेलेल्या इतर तिघा आरोपींना बिदर रोडसमोरील पंपासमोरून ताब्यात घेतले होते.

याबाबत गुरुबस खंकरे यांच्या फिर्यादीवरून मंगेश जाधव (रा. पाटोदा, ता. जळकोट), सिद्धार्थ ताटवाडे (रा. रेड्डी कॉलनी, उदगीर), दिगंबर डोंगरे (रा. समतानगर, उदगीर), सिकंदर शेख (रा. विकास नगर, उदगीर) यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात २३ जुलै २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास ग्रामीण ठाण्याचे सपोनि. अशोक घारगे यांनी वरील सर्व आरोपींविरुद्ध पुरावे जमा करुन उदगीरच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. न्यायालयाने चारही आरोपींना २ वर्षे ३ महिने कारावास व प्रत्येकी १२ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

टॅग्स :RobberyचोरीlaturलातूरPoliceपोलिसatmएटीएमCourtन्यायालय