शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

भामट्याने केली अलिबागच्या तहसीलदारांचीच फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 23:29 IST

तालुक्यातील वेलटवाडी गावचा पुनर्वसन आराखडा तयार करून त्याने लोकांची आर्थिक फसवणूक केली असून, त्याच्यावर औरंगाबाद, कर्जत, मुंबईसह गुजरातमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

अलिबाग : चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत, मदतीच्या नावाखाली एका भामट्याने अलिबागच्या तहसीलदारांचीच फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील वेलटवाडी गावचा पुनर्वसन आराखडा तयार करून त्याने लोकांची आर्थिक फसवणूक केली असून, त्याच्यावर औरंगाबाद, कर्जत, मुंबईसह गुजरातमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीनंतर या भामट्याला बेड्या ठोकण्यात आल्या असून, न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.३ जूनला रायगडला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. अलिबाग तालुक्यात घरे, बागायती, शेतींचे मोठे नुकसान झाले. आपाद्ग्रस्तांना मदत करण्यासाठी, मोडलेले संसार उभे करण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था व व्यक्ती पुढे आल्या. त्यांनी अन्नधान्य, औषधे व इतर साहित्याचे वाटप केले. मात्र, मदतीच्या नावाखाली डॉ.साजिद सैय्यद नामक भामटाही अलिबाग तहसील कार्यालयात आला. त्याने आॅल इंडिया रिहॅबिलिटेशन फोरम या संस्थेचा अध्यक्ष असल्याचे तहसीलदारांना सांगितले. मी लंडन येथून पीएच.डी केली आहे, तसेच यापूर्वी अनेक ठिकाणी गरजू व गरीब लोकांना मदतीचे वाटप केल्याचेही त्याने सांगितले. सुरुवातीला त्याने काही लोकांना मास्क, सॅनिटायझर आदी साहित्याचा पुरवठा केला, तसेच तालुक्यातील मौजे वेलटवाडी येथील आदिवासी बांधवांचे पुनर्वसन करतो, असे सांगितले. त्याकरिता डॉ.साजिद सैय्यद याने एक पुनर्वसन प्रकल्प आराखडा तयार केला. तो दाखवून त्याने पुणे येथील काही लोकांची आर्थिक फसवणूक केली. कोविड रुग्णांच्या उपचारासाठी तहसील कार्यालयांतर्गत वॉररूम व मोबाइल अ‍ॅप विकसित करून देत असल्याचे सांगत, त्याने सर्वांचा विश्वास संपादन केला आणि आपला डाव साधला.अलिबाग शहरातील फार्मासिटीकल डिलर, फर्निचर डिलर यांच्याकडून मोठ्या प्रमाणात साहित्य उधारीवर उचलले, तसेच खोट्या लेटर पॅडवर डॉक्टरांची नियुक्ती केली. त्याच्या या एकंदरीत कृतीबाबत संशय आल्याने तहसीलदार सचिन शेजाळ यांनी त्याच्याबद्दलची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. या दरम्यान, तो भामटा असल्याचे स्पष्ट झाले.डॉ. सैय्यद याच्या जुन्या क्राइम रेकॉर्ड तपासणीत त्याच्याविरोधात बांद्रा पोलीस ठाणे, जुहू पोलीस ठाणे, पंतनगर पोलीस ठाणे, गुजरात येथील करंज पोलीस ठाणे, तसेच इतरही अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात ११ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे.सावध राहण्याचे आवाहन- डॉ. साजिद सैय्यदला अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता, १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, १६ सप्टेंबर रोजी पुन्हा न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. त्याने औरंगाबाद, कर्जत व मुंबई येथेही अशाच प्रकारे लोकांची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे त्याच्यापासून सावध राहण्याचे आवाहन तहसीलदार शेजाळ यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी