नागपुरातील क्रिकेट बुकी अलेक्झांडरला अडीच कोटींची खंडणी मागितली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 08:52 PM2020-03-20T20:52:32+5:302020-03-20T20:54:53+5:30

शहरातील कुख्यात बुकी राज ऊर्फ हृदयराज जोसेफ अलेक्झांडर (वय ३५) याला अडीच कोटीची खंडणी मागणारा गँगस्टर स्वप्निल साळुंके आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Alexander, a cricket bookie in Nagpur, demands a ransom of Rs 2.50 crores | नागपुरातील क्रिकेट बुकी अलेक्झांडरला अडीच कोटींची खंडणी मागितली

नागपुरातील क्रिकेट बुकी अलेक्झांडरला अडीच कोटींची खंडणी मागितली

Next
ठळक मुद्देतीन तास डांबून, बेदम मारहाण, जीवे मारण्याची धमकी : गँगस्टर स्वप्निल साळुंके अन् टोळीचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कुख्यात बुकी राज ऊर्फ हृदयराज जोसेफ अलेक्झांडर (वय ३५) याला अडीच कोटीची खंडणी मागणारा गँगस्टर स्वप्निल साळुंके आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राज अलेक्झांडर हा मध्य भारतातील कुख्यात बुकी आहे. आयपीएल, वर्ल्ड कपमध्ये तो आणि त्याचे साथीदार क्रिकेट सट्टयावर कोट्यवधींची लगवाडी, खयवाडी करतात. सदर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, कुख्यात बुकी विक्की वाधवानी (रा. सागर, मध्य प्रदेश), जरीपटक्यातील बुकी राहुल ऊर्फ योगू, इमानू बेल ऊर्फ आरिफ भुऱ्या, बुकी विलास पाटील (तिरंगा चौक, सक्करदरा) यांच्यात क्रिकेट सट्टयाचे २०१३ पासून व्यवहार चालतात. सगळा आर्थिक व्यवहार उधारीवरच चालतो. महिन्यातील विशिष्ट तारखेला ही मंडळी लेण-देणचा व्यवहार करतात. उपरोक्त आरोपींना बुकी राज अलेक्झांडरला ३७ लाख रुपये देणे होते. त्यांच्यातील व्यवहारात अलीकडे कटुता आली. त्यामुळे रक्कम थकीत राहिल्याने आरोपींनी कुख्यात गँगस्टर स्वप्निल साळुंकेला वसुलीसाठी हाताशी धरले. मंगळवारी १७ मार्चला रात्री ८.३० च्या सुमारास कुख्यात साळुंके त्याच्या टोळीतील सहा ते सात गुंडांसह विक्की, राहुल, आरिफ भुºया आणि विलास पाटील या बुकींना घेऊन राज अलेक्झांडरच्या सदर रेसिडेन्सीमधील प्रॉपर्टी बीअर बारमध्ये शिरला. त्यांनी ३७ लाखांची थकीत आणि त्यावर २ कोटींची खंडणी असे एकूण दोन कोटी ३७ लाख रुपये राजला मागितले. ते दिले नाहीत म्हणून आरोपींनी राजला बेदम मारहाण करून तब्बल तीन तास त्याच्याच कार्यालयात डांबून ठेवले. खंडणी दिली नाही तर जीवे ठार मारेन, अशी आरोपी धमकी देत होते. त्यावेळी रोकड उपलब्ध न झाल्याने आरोपींनी त्याला काही दिवसांची मुदत देऊन राजचे कार्यालय सोडले. क्रिकेटच्या सटोड्यांमध्ये या प्रकाराचा बोभाटा झाल्यानंतर गुन्हे शाखेकडे त्याची माहिती पोहचली. त्यानंतर पोलीस कामी लागले. सक्रिय झालेल्या पोलिसांनी बुकी अलेक्झांडरची सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली. या प्रकारामुळे बुकी बाजारात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Alexander, a cricket bookie in Nagpur, demands a ransom of Rs 2.50 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.