शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने Netflix सबस्क्रिप्शनसाठी चुकीच्या लिंकवर केले क्लिक, झटक्यात गमावले एक लाख तीस हजार रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 18:30 IST

cyber crime : एका महिलेने तक्रार केल्याप्रमाणे तिला नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घ्यायचे होते. पण तिने चुकीच्या लिंकवर सब्सक्रिप्शन केले.

गाझियाबाद : सध्या ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) केल्याच्या तक्रारी वाढताना दिसून येत आहेत. दरम्यान, ऑनलाइन फसवणुकीला बळी पडल्याची तक्रार केल्यानंतरही तुम्ही पुन्हा सायबरचे बळी (Cyber Crime) होऊ शकता. याआधी कमी फसवणूक झाली असेल, पण पुन्हा मोठी फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे पोलिसांसमोर (Police) येतात. गाझियाबाद जिल्ह्यातही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणांमध्ये ऑनलाइन फसवणूक किंवा पैसे हडप करण्यात आले. याशिवाय, एका वेबसाइटवर लिंक पाठवून स्वतःला पेटीएम कस्टमर केअरचा (Paytm Customer Care)  कर्मचारी सांगून समोरच्या व्यक्तीची फसवणूक केली.

गाझियाबादमध्ये तीन महिन्यांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ज्यांच्यासोबत सायबर फसवणूक केली होती. या प्रकरणी पीडितांनी सायबर पोलिसांना कळवले असून, तत्काळ तक्रार नोंदवण्यात आली आहे. सायबर सीओ अभय कुमार मिश्रा म्हणाले की, पोलिस सायबर क्राईमवर कारवाई करत आहेत. पोलिसांनी तीन महिन्यांत पीडितांना ४३ लाख रुपये मिळवून दिले आहेत.यामध्ये अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

एका महिलेने तक्रार केल्याप्रमाणे तिला नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घ्यायचे होते. पण तिने चुकीच्या लिंकवर सब्सक्रिप्शन केले. त्यामुळे सायबर भामट्यांनी एक लाख तीस हजार रुपये हडप केले. तसेच अनेकांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक झाली आहे. मात्र, या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अशा पीडितांना पैसे परत मिळवून दिले आहेत, तर अनेक प्रकरणांवर पोलीस सातत्याने काम करत आहेत. लोकांनी सतर्क राहावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

पेटीएम वॉलेटच्या माध्यमातून इतर सायबर फसवणुकीद्वारे कोणताही गुन्हा घडला असेल तर त्याची 24 तासांच्या आत तात्काळ पोलिसांना तक्रार करावी. तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित एजन्सीला माहिती दिली जाते. ईमेलच्या माध्यमातून गाझियाबाद सायबर पोलीसही अनेक प्रकरणांवर कसरत करत आहेत. सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांची मोहीम सुरू आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम