शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  तस्करीत अडकला दारु व्यावसायिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 23:55 IST

गुन्हे शाखा पोलिसांनी मेयो हॉस्पिटल चौकातील दारू विक्रेता अशोक वझानीच्या दारू तस्करीचा भंडाफोड केला आहे. पोलिसांनी वझानीच्या मदतीने दारूची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना रंगेहात पकडले आहे.

ठळक मुद्दे५.८५ लाखाचे साहित्य जप्त : गुन्हे शाखेची कारवाई

 लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी मेयो हॉस्पिटल चौकातील दारू विक्रेता अशोक वझानीच्या दारू तस्करीचा भंडाफोड केला आहे. पोलिसांनी वझानीच्या मदतीने दारूची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून दारू आणि स्कॉर्पिओसह ५.८५ लाखाचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे तस्करी करणाऱ्या दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.रमेश मारोतराव भुते (४२) रा. नेताजीनगर असे आरोपीचे नाव आहे. त्याला दारूचा पुरवठा करणाºया अशोक लखाराम वझानीलाही आरोपी बनविण्यात आले आहे. वझानी यांचे मेयो हॉस्पिटल चौकात चंद्रलोक बिल्डींगमध्ये वाईन शॉप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वझानी अनेक दिवसांपासून शहरातील अवैध दारू विक्रेत्यांना दारूचा पुरवठा करतात. वझानीची पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागात ओळख आहे. यामुळे त्याच्यावर कारवाई होत नव्हती. गुन्हे शाखेच्या झोन चारच्या पथकाला वझानीचा साथीदार रमेश भुते हा नेताजीनगरात दारूची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. बुधवारी सायंकाळी रमेश स्कॉर्पिओ क्रमांक एम. एच. ४०, ए-९०९९ मध्ये दारूच्या १३ पेट्या घेऊन नेताजीनगरच्या गायत्री कॉलनीत पोहोचला. पोलिसांनी धाड टाकून रमेशला पकडले. स्कॉर्पिओची तपासणी केली असता त्यात दारूच्या १३ पेट्या आढळल्या. रमेशने ही दारू वाईन शॉपमधून खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी लगेच वाईन शॉप गाठले. कारवाईची माहिती मिळताच वझानी फरार झाला. पोलिसांनी ८५ हजाराची दारू आणि ५ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ जप्त केली आहे. वझानीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे दारू व्यावसायिकात खळबळ उडाली आहे. मेयो हॉस्पिटल चौक अनेक दिवसापासून दारू तस्करीचा अड्डा झाला आहे. ‘लोकमत’ने वेळोवेळी याचा खुलासाही केला आहे. दोन महिन्यापूर्वी झोन पाचच्या पथकाने मेयो हॉस्पिटल चौकातून कारमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या युवकाला यशोधरानगरात पकडले होते. दारूची तस्करी आणि ग्राहकांद्वारे रस्त्यावर दारू घेण्यात येत असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांनी अनेकदा पोलिसांना तसेच उत्पादन शुल्क विभागाला तक्रार देऊनही कारवाई होत नव्हती. आरोपींविरुद्ध दारू प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक मसराम, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप चंदन, उपनिरीक्षक पुरुषोत्तम मोहेकर, हवालदार देवेंद्र चव्हाण, सुधाकर धंदर, कृपाशंकर शुक्ला, प्रशांत कोडापे, सचिन तुमसरे, बबन राऊत यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदीSmugglingतस्करीArrestअटक