शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दारुच्या नशेत तिघांवर चाकूने हल्ला, एकाची प्रकृती गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 21:29 IST

कळंगुटचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना मंगळवारी मध्यरात्री १.१५ वा. सुमाराला घडली.

ठळक मुद्देघटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलीस लागलीच घटनास्थळी दाखल झाले. जखमीतील सागर राठोड याच्या शरीरावर विविध ठिकाणी वार करण्यात आले असल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे.

म्हापसा - कळंगुट येथील एका हॉटेलात सुरु  असलेल्या पार्टीत दारुच्या नशेत एका मित्राने त्याच्या सोबत असलेल्या इतर तिघा मित्रांवर चाकूने खूनी हल्ला करुन जखमी करण्याची घटना घडली आहे. जखमींतील एकाची स्थिती चिंताजनक असून सर्वांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. 

कळंगुटचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना मंगळवारी मध्यरात्री १.१५ वा. सुमाराला घडली. कळंगुट-बागा रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलात चौघे मित्र पार्टी करण्याच्या निमित्ताने दारुचे प्राशन करीत एकत्रीत बसले होते. पार्टी सुरु असताना त्यांच्यात सुरुवातीला किरकोळ वादावादी सुरु झाली. या वादावादीचे पर्यावसान खूनी हल्ल्यात झाले. त्यात संशयित मंजूनाथ काडलीकोप्पा (म्हापसा, मूळ कर्नाटक) याने अचानपणे आक्रमक होत इतर तिघांवर चालूने वार करण्यात सुरुवात केली. अचानकपणे सुरु झालेल्या या प्रकारातून सर्वजण हादरून गेले. एकच धावपळ सुद्धा सुरु झाली. 

मंजूनाथ काडलीकोप्पाने केलेल्या हल्ल्यात सागर राठोड (कळंगुट), उमेश चव्हाण (म्हापसा) तसेच कृष्णा राठोड (साळगाव) हे जखमी झाले. जखमीतील सागर राठोड याच्या शरीरावर विविध ठिकाणी वार करण्यात आले असल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. इतर दोघांबरोबर त्यालाही उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. इतर दोघांची प्रकृती मात्र स्थिर तसेच चिंताजनक नसल्याने निरीक्षक दळवी यांनी सांगितले. 

घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलीस लागलीच घटनास्थळी दाखल झाले. संशयीत मंजूनाथ काडलीकोप्पा याला घटनास्थळी अटक करुन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळी पंचनामा करुन महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेवून प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. उपनिरीक्षक प्रजीत मांद्रेकर निरीक्षक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसhotelहॉटेल