शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोटः जेवन बनविण्याचे कारणावरुन एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2021 13:49 IST

Murder : पिंप्री खुर्द शिवारात घडली घटना.

- विजय शिंदेअकोटः सातपुडा पायथ्याशी असलेल्या पिंप्री खुर्द शिवारात जेवन बनविण्याचे कारणावरुन मध्यरात्री हत्याकांड घडल्याची घटना २ मे रोजी उघडकीस आली. या हत्याकांडानंतर पळालेल्या आरोपीला पकडण्यात ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांचा जनसंपर्क कामी आला. काही तासातच अकोट ग्रामीण पोलीसांनी मोठ्या शिताफीने पकडून बेड्या ठोकल्या आहेत.अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील  गजानन बोदडे यांचे शेतात संत्रा झाडाची खोड काढण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील  गिरगोटी गावातील छबुलाल भुसुम, प्रभु राजराम धीकार व रतीराम राजाराम दारशिंबे हे तीन आदिवासी मजुर आले होते. या मजुरांनी दिवसभर काम करुन रात्री दारु ढोसली. त्यानंतर रात्री १२ वाजता नंतर स्वयंपाक कोणी करण्याचा या  कारणावरुन शेतातच वादावादी सुरु झाली. यावेळी प्रभु राजाराम धीकार यांने रतीरामला मारहाण केल्याने तो पळुन गेला. त्यानंतर छबुलाल भुसुम यांला प्रभु राजाराम धीकार यांने कुऱ्हाडाने व लाकडांनी चांगली मारहाण केली. त्यामुळे जखमी अवस्थेत असेल्या छाबुलाल भुसुम याचा मारहाणीत मृत्यू झाल्याने प्रभू धिकार पळुन गेला. त्यानंतळ सकाळी रतीराम हा शेतातील घटनास्थळी आल्यानंतर त्याला छबुलाल शुकलाल भुसुम ची हत्या झाली असुन मृतदेह आढळला. हत्याकांडाची माहीती मजुर कंत्राटदार शरिफोद्दीन नशीरोद्दीन रा. अकोट याला दिल्यानंतर पोलीस पाटील, रतीराम, शेतमालक व मजुर कंत्राटदार यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. सविस्तर घटनेची माहीती  घेताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील आरोपी प्रभु धीकार हा पळुन गेला होता. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी प्रभु धीकार यांचे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला सोमठाणा येथुन अटक केली असुन पुढील तपास सुरु आहे.

अशा ठोकल्या आरोपीला बेड्यामध्यरात्री हत्याकांडानंतर आरोपी हा  घटनास्थळावरून जंगलाकडे पसार झाला असे लोकेशन पोलीसांना मिळाले. त्यामुळे आरोपीला पकडणे पोलीसांना अवघड झाले होते. पंरतु आरोपीला पकडण्यात अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांचा जनसंपर्क कामी आला. आरोपीचे वर्णन देत ठाणेदार व पोलीस पथकाने या भागातील जनतेला सतर्क केले. दरम्यान आरोपी प्रभु धीकार हा सोमठाणा येथे कपडे बदलुन आला होता. पळुन जाण्यासाठी नातेवाईकांचे मोटर सायकलची वाट बघत होता. जनसंपर्क मधील एका व्यक्तीने ठाणेदार फड यांना माहीती देत आरोपीचा फोटो पाठवुन पडताळणी केली असता, परिसरातील आदिवासी युवकांनी व ग्रामीण पोलीसांनी सोमठाणा येथे घेराव घालून पळुन जात असतांना आरोपीला पकडले केली.

टॅग्स :akotअकोटAkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी