शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : अपघात जखमी आईचाही मृत्यू; मुलगी जागीच ठार

By राजेश शेगोकार | Updated: March 9, 2023 12:03 IST

नेहरू पार्क चाैकात झाला हाेता अपघात 

अकोला : नेहरू पार्क चौकातून गाेरक्षण राेडवरील घराकडे दुचाकीने जाणाऱ्या आई व मुलीला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने बारा वर्षीय मुलीचा बुधवारी रात्री जागीच मृत्यू झाला. आई गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले  हाेते उपचारादरम्यान गुरूवारी सकाळी जखमी आईचाही मृत्यू झाला आहे. 

गोरक्षण रोड भागात राहणाऱ्या किरण तुपवणे या आपली मुलगी स्पंदना हिच्यासाेबत बुधवारी रात्री दुचाकीने घरी परतत असताना नेहरू पार्क चौकात पुलावरून उतरून येणाऱ्या एन एल ०१ - ए एफ ९१५२ क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील दोघी मायलेकी दूरवर फेकल्या गेल्या. मुलगी स्पंदनाचा जागीच मृत्यू झाला असून आई किरण तुपवणे गंभीर जखमी झाली.

अपघात घडल्यानंतर नागरिकांनी तत्काळ जखमी किरण तुपवणे यांना सर्वाेपचार रूग्णालयात दाखल केले हाेते मात्र उपचारादरम्यान गुरूवारी सकाळी त्यांच्या मृत्यू झाला. नेहरू पार्क चाैकात उड्डाणपुलावरून येणारी वाहतूक भरधाव असते तर सिव्हील लाईन्स, गाेरक्षण राेड व अशाेक वाटीका या मार्गावरून येतांना काेणतेही गतिराेधक, सिग्नल यंत्रणा नाही त्यामुळे येथे वाहतूकीची काेंडी हाेण्यापासून लहान माेठे अपघात नेहमीच घडतात.

टॅग्स :Accidentअपघात