शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना सापडला अजनीचा पीएसआय : नागपूर शहर पोलीस हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 23:31 IST

अजनी पोलीस ठाण्यातील एका पीएसआयला अ‍ॅण्टी करप्शन ब्यूरोने एक लाख रुपयांची लाच घेताना पकडले. बुधवारी दुपारी झालेल्या या कारवाईने शहर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे यापूर्वीही तीन वेळा घेतले पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनी पोलीस ठाण्यातील एका पीएसआयला अ‍ॅण्टी करप्शन ब्यूरोने एक लाख रुपयांची लाच घेताना पकडले. बुधवारी दुपारी झालेल्या या कारवाईने शहर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. राजेशसिंह केशवसिंह ठाकूर (५६) असे आरोपीचे नाव आहे.ठाकूर दीड वर्षापासून अजनी ठाण्यात कार्यरत आहे. तक्रारकर्ता रेल्वेचा कंत्राटदार आहे. त्याच्याविरुद्ध अजनी ठाण्यात मागच्या वर्षी हेराफेरी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात सप्टेंबर महिन्यात त्याला अटकही झाली होती. या प्रकरणाचा तपास पीएसआय ठाकूरकडे होता. ठाकूरने त्याला २९ सप्टेंबर रोजी अटक केली होती. तक्रारीनुसार ठाकूरने अगोदर अटकेच्या नावावर तक्रारकर्त्याकडून पैसे घेतले. यानंतर पोलीस कोठडीमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट देणे आणि जप्त मोबाईल परत करण्यासाठी तीन वेळा पैसे घेतले. तक्रारकर्त्यांची अजनीत जमीन आहे. या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याने ठाकूरला अतिक्रमण हटविण्याचे काम सोपविले होते. हे काम झाल्यानंतर ठाकूर तीन लाख रुपयांची मागणी करू लागला. यादरम्यान ठाकूरचा पाय फ्रॅक्चर झाला. तो तीन महिने आजारी सुटीवर गेला. सुटी संपताच कोरोनाचे संकट आले. यामुळे ते काम अडकून होते. काही दिवसांपासून ठाकूर पुन्हा तक्रारकर्त्यास पैसे मागू लागला. टाळाटाळ केल्यानंतरही ठाकूर त्याच्यावर दबाव टाकू लागला. तक्रारकर्त्याने आर्थिक तंगीचे कारण सांगितल्यावर ठाकूर एक लाख रुपयात प्रकरण संपण्यास तयार झाला. लाच देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदाराने एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्याकडे तक्रार केली. एसीबीने केलेल्या चौकशीत तक्रार खरी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याला रंगेहात पकडण्याची योजना आखण्यात आली. बुधवारी ठाकूर शताब्दीनगर चौकात बंदोबस्तावर होता. त्याने तक्रारकर्त्यास शताब्दीनगर चौकात बोलावले. तिथे एक लाख रुपये घेताच त्याला अटक करण्यात आली. एसीबीने लगेच ठाकूरच्या घराचीही झडती घेतली. या कारवाईची माहिती होताच अजनी ठाणे आणि शहर पोलीस विभागात खळबळ उडाली. ठाकूरला अटक करून अजनी ठाण्यात भ्रष्टाचारविरोधी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कार्रवाई अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर अधीक्षक राजेश दुद्दलवार, मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक योगिता चाफले, मोनाली चौधरी, मंगेश कळंबे, लक्ष्मण परतेकी, रविकांत डहाट, अस्मिता मेश्राम, वकील शेख यांनी केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिस