शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मिशी का ठेवतोस? दलित तरुणाला टोळक्याकडून काठी, रॉडनं जबर मारहाण; डोक्याला दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 12:56 IST

एकूण दहा जणांविरोधात एफआयआर दाखल; तिघांना पोलिसांकडून अटक

अहमदाबाद: एका २२ वर्षीय दलित तरुणाला टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदाबादच्या ग्रामीण भागात घडली आहे. पिळदार मिशी ठेवल्यानं तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.दलित तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी ऍट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत एकूण दहा जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यापैकी चार जण अज्ञात आहेत. टोळक्यानं केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणावर शिव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर सोमवारी विरामगाम ग्रामीण पोलिसांनी एफआयआर दाखल केला.काय सांगता? अंत्यसंस्कार झाले, पिंडदानही केलं अन् १० दिवसांनी 'तो' जिवंत परतलासुरेश वाघेला असं पीडित तरुणाचं नाव असून तो कराकथल गावचा रहिवासी आहे. अहमदाबादमधील साणंद जीआयडीसीमधील व्होल्टास कंपनीत तो कार्यरत आहे. धामा ठाकोर, कौशिक वालंद, अत्रिक ठाकोर, संजय ठाकोर, आनंद ठाकोर, विजय ठाकोर अशी आरोपींची नावं आहेत. हे सगळे कराकथल गावचेच रहिवासी आहेत.माहेरी जाताना नवऱ्याला बाईक थांबवायला सांगितली, सासू अन् मुलीसमोर नदीत उडी घेतली; अन्...या प्रकरणी सुरेश वाघेला यांनी पोलीस तक्रार दाखळ केली आहे. 'रविवारी रात्री १० च्या सुमारास जेवण झाल्यानंतर माझे पालक झोपायला गेले. त्यानंतर मला धामा यांच्याकडून फोन आला. मिशी का ठेवतोस असा सवाल त्यानं विचारला. पुढच्या काही मिनिटांमध्ये धामा आणि इतर नऊजण माझ्या घरी आले. त्यांनी मला काठ्यांनी आणि रॉडनं मारहाण केली. त्यांनी शिवीगाळ करत माझ्यावर हल्ला केला,' असा जबाब त्यानं पोलिसांना दिला.