शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी गेल्यामुळे प्रेयसीनं केलं ब्रेकअप; संतापलेल्या प्रियकरानं भेटायला बोलावलं, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 09:36 IST

२० वर्षीय आरोपी हरिश हा महरौली परिसरात राहत होता. तर मृत १९ वर्षीय पीडित युवती खानपूरच्या दुर्गा विहार वास्तव्यास होती.

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत प्रियकरानं प्रेयसीची चाकू भोसकून निर्दयी हत्या केल्यानं परिसरात खळबळ माजली आहे. महरौली परिसरातील ही घटना आहे. याठिकाणी प्रियकर आणि प्रेयसीत काही कारणांवरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात प्रियकरानं प्रेयसीचं आयुष्य संपवलं. आरोपी प्रियकरानं चाकूने प्रेयसीच्या गळ्यावर अनेक वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. घटनास्थळावर पोहचलेल्या पोलिसांनी जखमी मुलीला हॉस्पिटलला नेले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, २० वर्षीय आरोपी हरिश हा महरौली परिसरात राहत होता. तर मृत १९ वर्षीय पीडित युवती खानपूरच्या दुर्गा विहार वास्तव्यास होती. गेल्या २-३ वर्षापासून हरिश आणि युवती यांच्यात प्रेम संबंध होते. मागील २ महिन्यापासून हे दोघंही आया नगर भागात एकत्र राहत होते. आरोपी ऑटो रिक्षा दुरुस्त करण्याचं काम करत होता. परंतु १ वर्षापासून त्याची नोकरी गेली. त्याला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळाली नाही. या कारणावरून प्रियकर आणि प्रेयसीत सातत्याने वाद होत असे.

ब्रेकअपमुळे नाराज होता हरीश

६ दिवसांपूर्वी मृत युवती आणि हरीश दोघांमध्ये वाद झाला. ज्यानंतर तिने हरीशसोबत ब्रेकअप केला आणि तिच्या आई वडिलांकडे परत गेली. त्यामुळे हरिश खूप रागात होता. त्याने प्रेयसीला भेटण्यासाठी बोलावलं. युवतीने प्रियकाराची विनंती मान्य करत भेटायला गेली. सोमवारी संध्याकाळी ५ वाजता जेव्हा ते भेटले तेव्हा पुन्हा दोघांमध्ये वाद सुरू झाला. हरीश आधीपासून रागात होता. युवती तिथून निघायला लागली तेव्हा त्याने तिच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यात ती गंभीर जखमी झाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्याठिकाणी हजर झाले. तोपर्यंत हरीशने पळ काढला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवतीला पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र उपचारावेळी युवतीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात प्रियकराविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपी हरिशला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक नेमण्यात आले. आरोपीला अटक करून पुढील तपास केला जाणार आहे. मात्र या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी