शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

 पत्नीला भोसकून वृद्धाने स्वत:वरही फिरवला चाकू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 02:23 IST

कांदिवली पूर्वच्या ठाकूर व्हिलेज परिसरातील मर्क्युरी इमारतीत तिसऱ्या मजल्यावर विष्णुकांत बालूर (७९) व पत्नी शकुंतला (७६) राहतात.

मुंबई : पोटचा पोर विदेशात कुटुंबासह स्थायिक झाल्यावर वृद्ध आई-बाप एकमेकांच्या आधारावर जगत होते. मात्र कसल्याशा आजाराने वृद्ध पत्नीला अंथरुणावर खिळवले, तर पतीला ४० वर्षे पाठीच्या दुखण्याने बेजार केले. या  सगळ्याला कंटाळून त्यांनी स्वतःचे आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला. मात्र माझ्यामागे माझ्या पत्नीचे काय? असा विचार करून आधी तिची हत्या करत नंतर स्वतःलाही संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 

कांदिवली पूर्वच्या ठाकूर व्हिलेज परिसरातील मर्क्युरी इमारतीत तिसऱ्या मजल्यावर विष्णुकांत बालूर (७९) व पत्नी शकुंतला (७६) राहतात. बालूर एका खासगी कंपनीतून सीईओ म्हणून निवृत्त झाले होते. त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली असून, मुलगा २५ वर्षांपूर्वी अमेरिकेला जाऊन स्थायिक झाला. त्यांनी अनिता थोरात (४०) या महिलेला दोन दिवसांपूर्वीच १५ हजार रुपयांच्या मासिक पगारावर ठेवले होते. शकुंतला यांना जेवण, औषधे देणे व स्वच्छता करण्याची जबाबदारी दिली. त्यांच्याकडे अजून दोन महिलाही काम करतात. थोरातने पोलिसांना सांगितले की, त्या शुक्रवारी सकाळी ८च्या सुमारास बालूर यांच्या घरी गेल्या, मात्र बेल वाजवूनही काही प्रतिसाद न आल्याने चौकीदाराला बोलावले. तेव्हा त्याने दार ठोकायच्या आधीच आजोबांनी दरवाजा उघडला. चौकीदार आत गेला व थोड्या वेळाने घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आल्यावर मला समजले की वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. चौकीदाराने शेजाऱ्यांना कळवून त्यांच्या मदतीने जखमी जोडप्याला रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी बालूरविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या मुलाला कळवले आहे. बालूर यांच्यावर शताब्दी तर शकुंतलांवर सेव्हन स्टार रुग्णालयात उपचार सुरू असून, दोघांचीही प्रकृती स्थिर आहे, असे समतानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण राणे यांनी सांगितले.

...आणि ते खाली कोसळलेबालूरनी शुक्रवारी पहाटे ३च्या सुमारास शकुंतलांच्या डोक्यावर व कानावर चाकूने ६ ते ७ वेळा वार केले. नंतर त्याच चाकूने स्वतःचाही गळा चिरण्याचा प्रयत्न केला. 

मी पार कंटाळलो होतो..पाठदुखी व त्यात रात्री-बेरात्री पत्नीची सुश्रूषा करावी लागे, याला कंटाळलो. पण  स्वतःला संपविले तर बायकोला कोण बघणार या काळजीने तिची हत्या करून मग स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी