शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदारांना एक फोन आला अन् पोलिसांनी चिमुकलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 20:18 IST

चिमुकलीची हत्या झाल्याचा संशय

यवतमाळ : सातवीही मुलगी झाल्याने तिला ठार मारल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्यानं मुलीचा पुरलेला मृतदेह महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं. घाटंजी तालुक्यातील करमनामध्ये हा प्रकार घडला.करमना गावातील अशोक श्यामराव शिंदे यांना २८ जून रोजी मुलगी झाली. त्याआधी त्यांना सहा मुलीच झाल्या होत्या. १५ जुलैला त्यांच्या सातव्या मुलीचा मृत्यू झाला. तिचा दफनविधीही पार पडला. दरम्यान, घाटंजीचे ठाणेदार दिनेश शुक्ला यांना निनावी फोन आला. करमना गावातील बालिकेचा मृत्यू नैसर्गिक नाही, तिला नख लावून ठार मारण्यात आलं, अशी माहिती फोन केलेल्या व्यक्तीनं दिली. ही माहिती ऐकताच ठाणेदार शुक्ला यांनी प्राथमिक माहिती काढून मृत्यू झाल्याची खातरजमा केली. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची मृतदेह उकरण्यासाठी परवानगी घेतली. ठाणेदार शुक्ला व नायब तहसीलदार राठोड घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत १८ दिवसांच्या बालिकेचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला. अद्याप तरी शवविच्छेदन झालेलं नाही. शवचिकित्सा अहवालानंतर या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, असे घाटंजीचे ठाणेदार दिनेश शुक्ला यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यातील मृत बालिकेचे वडिल रोजगाराच्या शोधात छत्तीसगडला गेल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं. 

टॅग्स :Deathमृत्यूMurderखून