शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

पत्नीशी भांडण झाल्याने पोलीस अधिकाऱ्याने झाडली बंदुकीची गोळी अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 20:41 IST

Firing : मुलगा होत नसल्याबाबत पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याचा आरोप आहे. 

ठळक मुद्देएडीसीपी ईस्टर्न एसएम कासिम आबिदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यादव मूळचे जौनपूरच्या हमजा येथील रहिवासी असून तो उत्तर प्रदेश पोलिसात निरीक्षक म्हणून तैनात आहे.

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या संरक्षण ताफ्यात तैनात असलेले पोलीस निरीक्षक धर्मेंद्र यादव यांनी पत्नीशी झालेल्या वादादरम्यान आपल्या बंदुकीतून गोळी झाडली. या गोळीबारात शेजारची महिला अंशिका गुप्ता जखमी झाली. पोलिसांनी आरोपी निरीक्षकास ताब्यात घेतले. त्याची सरकारी पिस्तूलही हस्तगत केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मुलगा होत नसल्याबाबत पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याचा आरोप आहे. एडीसीपी ईस्टर्न एसएम कासिम आबिदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यादव मूळचे जौनपूरच्या हमजा येथील रहिवासी असून तो उत्तर प्रदेश पोलिसात निरीक्षक म्हणून तैनात आहे. सध्या त्यांची पोस्टिंग माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या संरक्षण ताफ्यात आहे. धर्मेंद्र यादव गोमतीनगर विस्तार क्षेत्रातील खरगापूर येथे आपल्या कुटूंबासह राहतात. त्यांची पत्नी प्रियंका यादव आणि तीन मुली असा परिवार आहे. धर्मेंद्र हा सोमवारी संध्याकाळी उशिरा पत्नीशी भांडण करीत होता.भांडणाचा आवाज ऐकून शेजारील महिला अंकिता गुप्ता यादव यांच्याकडे आली. ती वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत होती. दरम्यान, संतप्त निरीक्षक धर्मेंद्र यादव यांनी गोळीबार केला. गोळी भिंतीवर आदळली आणि अंकिताच्या डाव्या खांद्यालागल्याने ती जखमी झाली.

गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहेगोळीबाराच्या आवाजाने आजूबाजूला खळबळ उडाली. धर्मेंद्रच्या घरी शेजारचे लोक आले. जखमी अंकिताला पाहून लोकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी आरोपी निरीक्षक धर्मेंद्रला ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून सरकारी पिस्तूल जप्त केली. गोमती नगर विस्तार निरीक्षक पवन कुमार पटेल यांनी आरोपीला पोलिस ठाण्यात नेले. त्याचवेळी, पीडित महिलेस तक्रार देण्यास बोलावले होते.मुलगा नसल्यामुळे पोलीस निरीक्षक संतप्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यादव यांना तीन मुली आहेत. मुलगा नसल्याबद्दल तो अनेकदा आपल्या पत्नीशी भांडत असे. याबद्दल बर्‍याच दिवसांपासून त्यांच्यात भांडण सुरू होते. सोमवारी संध्याकाळीही धर्मेंद्र यांनी पत्नी प्रियंकाबरोबर मुलगा नसल्याबद्दल भांडण केले, त्यानंतर या दोघांमध्ये वाद सुरू झाला. हे प्रकरण इतके वाढले की धर्मेंद्र रागावला आणि त्याने तेथून पिस्तूल काढून गोळीबार केला. पोलिस तपास करत आहेत.पत्नीशी भांडण करून केला गोळीबार आरोपी निरीक्षक धर्मेंद्र कुमार यादव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून सरकारी पिस्तूलही पोलिसांनी घेतले. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, पत्नीबरोबर झालेल्या भांडणाच्या वेळी त्याने हवेत गोळीबार केला होता. मात्र, शेजारी राहणारी अंकिता जखमी झाली आणि सध्या अंकिताच्या तक्रारीच्या आधारे पोलिस गुन्हा दाखल करत आहेत. - एसएम कासिम आबिदी, एडीसीपी पूर्व

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसAkhilesh Yadavअखिलेश यादवArrestअटक