शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पायल तडवीसारखा घडला प्रकार; नायर रुग्णालयात आणखी एका डॉक्टरने केली आत्महत्या

By पूनम अपराज | Updated: February 16, 2021 14:53 IST

Suicide : नायर रुग्णालयात काल रात्री ही घटना घडली. आग्रीपाड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

ठळक मुद्दे डॉ. भीमसंदेश तुपे (२६) तीन दिवसांपूर्वी वडिलांना भेटायला औरंगाबादला गेले होते. त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. शनिवारी औरंगाबादहून परत आल्यानंतर रविवारी दिवसभर त्यांनी रुग्णालयात काम केले होते.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या नायर रुग्णालयात डॉक्टरने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे.  खोलीतून डॉक्टरचा मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार डॉ. भीमसंदेश तुपे (२६) तीन दिवसांपूर्वी वडिलांना भेटायला औरंगाबादला गेले होते. त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. शनिवारी औरंगाबादहून परत आल्यानंतर रविवारी दिवसभर त्यांनी रुग्णालयात काम केले होते.खोलीत केली आत्महत्यासायंकाळी डॉ. तुपे आपल्या खोलीत परत आले तेव्हा त्याने स्वतःला इंजेक्शन मारून घेऊन आत्महत्या केली बराच वेळ दार ठोठावले, पण त्याने उघडले नाही. त्यानंतर दरवाजा तोडला तेव्हा त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही माहिती रुग्णालय प्रशासनाला त्याच्या खोलीतील दुसर्‍या सहयोगी डॉक्टरांनी दिली.

नायर रुग्णालयात काल रात्री ही घटना घडली. आग्रीपाड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या डॉक्टरने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. डॉ. तुपे नायर रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षणाचे विद्यार्थी होते. काल रात्री त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्यांच्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळून आला. हा तरुण डॉक्टर नायर रुग्णालयात एनस्थेशिया म्हणजेच भूल देणारा डॉक्टर होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. वडिलांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर डॉ. तुपे नायर रुग्णालयात परतले. काल दिवसभर त्यांनी रुग्णालयात नेहमीप्रमाणे काम केलं. रा

तो ज्या खोलीत झोपतो, ती खोली सकाळी बऱ्याच वेळेपर्यंत बंद होता. खोलीचं दार ठोठावूनही आतून काहीही उत्तर आलं नाही. त्यामुळे काही जणांनी मिळून खोलीचं दार उघडलं. तेव्हा डॉक्टर तुपे हे मृतावस्थेत आढळून आले, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भारमल यांनी दिली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.पोलिसांनी पंचनामा करुन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. 

 

डॉ. पायल तडवीने २२ मे २०१९ रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केल्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवून नायर हॉस्पिटलमधील तिच्या तीन सहकारी महिला डॉक्‍टरांना अटक केली होती. यामध्ये डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांचा समावेश आहे. आग्रीपाडा पोलिसांनी तिन्ही डॉक्‍टरांवर रॅगिंग आणि ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याdoctorडॉक्टरMumbaiमुंबईPoliceपोलिसpayal tadvi suicideपायल तडवी