शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईनंतर पुन्हा पुण्यात! सराफ व्यवसायिकाने दुकानमालकावर गोळ्या झाडल्या, नंतर स्वत: केली आत्महत्या

By विवेक भुसे | Updated: February 10, 2024 21:00 IST

Pune Gun Firing news Baner Area: गोळीबार करून रिक्षात बसला, थोड्या अंतरावर स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दहीसर येथे झालेल्या अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणासारखीच घटना पुण्यात शनिवारी सायंकाळी घडली. आर्थिक कारणावरुन सराफ व्यवसायिकाने आपल्या दुकानमालकावर भर चौकात गोळीबार केला. त्यानंतर रिक्षातून पोलीस ठाण्यात जात असताना रिक्षामध्ये स्वत: वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. दुकानमालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. 

अनिल ढमाले (वय ५२, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या सराफ व्यवसायिकाचे नाव आहे. आकाश गजानन जाधव (वय ४२, रा. बाणेर)  असे जखमी झालेल्या दुकानमालकाचे नाव आहे. ही घटना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलजवळील दुर्गा कॅफेजवळ शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. 

अनिल ढमाले हे सराफ व्यवसायिक आहेत. जाधव यांचे बाणेर येथील हाय स्ट्रीटवर दुकान आहे. जाधव यांनी ढमाले यांना हे दुकान भाड्याने दिले आहे. अनिल ज्वेलर्स म्हणून हे दुकान ढमाले चालवत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात आर्थिक वाद सुरु होता.  शनिवारी सायंकाळी  जाधव  यांच्या दुचाकीवर बसून ढमाले येत होते. ज्युपिटर हॉस्पिटलजवळ मागे बसलेल्या ढमाले याने जाधव यांच्या डोक्यात आपल्याकडील पिस्तुलातून गोळी झाडली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. त्यानंतर ढमाले याने तेथून पळ काढला. त्याने एक रिक्षा केली व रिक्षाचालक सतीश यादव याला रिक्षा चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याकडे घेण्यास सांगितले.

औंध येथील भाले चौकात रिक्षा  आली असताना त्याने रिक्षाचालकाला मला पाणी घेऊन ये, असे सांगितले. यादव हे पाणी आणायला गेले. तेवढ्यात ढमाले याने स्वत:वर गोळीबार करुन आत्महत्या केली. रिक्षामध्येच त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. ढमाले याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे सुसाईड नोट मिळाली. त्यात त्याने तीन महिन्यापासून ढमाले याला जाधव आर्थिक कारणावरुन त्रास देत होता. आता मला पर्याय नाही, म्हणून मी हा निर्णय घेत आहे, असे म्हटले आहे. ढमाले यांच्याकडे पिस्तुलचा परवाना असून त्याच पिस्तुलाने त्याने गोळीबार करुन स्वत:ही आत्महत्या केली आहे. 

दरम्यान आकाश जाधव यांच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :FiringगोळीबारPuneपुणे