शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! दुसरीही मुलगी झाल्यानं पत्नीचा खून करत पतीनं रेल्वेसमोर उडी मारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 19:36 IST

दोन लहान मुलींचे मातृ- पितृही हरपले, बुधवारी सकाळी सूरजच्या घरातून लहान बालिकेचा रडण्याचा आवाज येत  होता 

संजय सोनार 

चाळीसगाव  जि. जळगाव  : दुसरीही मुलगीच झाली म्हणून पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाड घालून जीवे ठार मारले.  त्यानंतर पतीने  रेल्वे खाली आत्महत्या केली. ही घटना २९ रोजी रात्री एक वाजेनंतर करगाव रोडवरील जय गणेश नगरात घडली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. दोन मुलींचे मातृ- पितृ छत्र हरपल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

चाळीसगावच्या जय गणेश नगरात सूरज दिलीप कुऱ्हाडे (२८) हा पत्नी रेशमा सूरज कुऱ्हाडे (२४) व दोन मुलीसह वास्तव्यास आहे.  पती-पत्नी खड्डे खोदण्याचे काम करून उदरनिर्वाह भागवित होते. गेल्या तीन महिन्यापूर्वी रेशमा हिला दुसरी मुलगी झाल्यामुळे तो नाराज होता. २५ रोजी सूरज हा पत्नीला घेण्यासाठी जुनवणे जि. धुळे येथे गेला होता. दोन दिवस सासरवाडीला राहिल्यानंतर २८ रोजी तो पत्नी व दोन्ही मुलींना घेवून चाळीसगावला आला.

बुधवारी सकाळी सूरजच्या घरातून लहान बालिकेचा रडण्याचा आवाज येत  होता.  शेजारच्या नातेवाईकांनी त्यांच्या घरात डोकावून पाहिले असता त्यांना रेशमा ही रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली.  घटना कळताच आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी रेशमाच्या माहेरी घटनेची माहिती दिली. घटनास्थळी सूरज मात्र उपस्थित नव्हता. त्याचवेळी सूरजच्या घरापासून जवळच असलेल्या धुळे रेल्वे मार्गावर रेल्वे खाली एका इसमाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.  तिथे पाहणी केली असता तो मृतदेह  सुरज याचा असल्याचे आढळून आला. मृत रेशमाचा भाऊ प्रताप शांताराम गायकवाड (रा.जुनवणे) यांनी  फिर्याद दिली. त्यावरुन मयत सुरज कुऱ्हाडे याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक भारत काकडे, पोलीस निरीक्षक के.के.पाटील, सहायक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी यांनी भेट दिली.