शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हार्बरनंतर आता वेस्टर्न! मुंबईत लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग; तरुणाचे अश्लिल चाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 10:31 IST

तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये अत्याचाराची घटना ताजीच असताना आता पुन्हा एकदा मुंबईतील लोकल महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ लोकलमध्ये २४ वर्षीय तरुणीची छेडछाड, अश्लिल बोलून शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तरुणी मालाडला राहते. ती गेल्या शुक्रवारी रात्री कामानिमित्ताने चर्नी रोडला जात होती. ग्रॅन्ट रोड स्थानकाजवळ येताच तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. 

तरुणीने आरडाओरडा केला, परंतू लोकलचा वेग कमी होताच त्याने उडी मारून पलायन केले. या तरुणाने तिच्याशी अश्लिल चाळे, वक्तव्ये केली. हे प्रकरण गेल्या आठवड्यातील शुक्रवारचे आहे. तर बुधवारी तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मुंबई-पनवेल लोकलमध्येही असाच प्रकार घडलेला...काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे पकडली होती. सदर मुलगी महिलांसाठीच्या जनरल डब्यातून प्रवास करत होती. सकाळची वेळ असल्यामुळे महिला डब्यामध्ये विशेष प्रवासी नव्हते. याचाच गैरफायदा घेत आरोपीने सीएसएमटी स्थानकात गाडीने वेग घेतल्यानंतर महिला डब्यात प्रवेश केला होता. दारूच्या नशेतील तरुणाने तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी मशीद बंदर स्थानकावर लोकलमधून उतरला आणि बाहेर पळून गेला होता. 

टॅग्स :Molestationविनयभंगwestern railwayपश्चिम रेल्वेlocalलोकल