शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅसिड हल्ल्यानंतर तरूणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले, तरुणीचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 18:12 IST

Crime News : एका 20 वर्षीय विवाहित तरूणीवर अ‍ॅसिड हल्ला केल्यानंतर तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना येळंबघाट (ता.बीड) येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरूणीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली

नेकनूर - एका 20 वर्षीय विवाहित तरूणीवर अ‍ॅसिड हल्ला केल्यानंतर तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना येळंबघाट (ता.बीड) येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरूणीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून आज सकाळी बीड जिल्हा रूग्णालयात तिचा मृत्यू झाला. माणूसकीला काळिमा फासणार्‍या घटनेने जिल्हा हादरला असून आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. अंत्यत निर्दयीपणे कृत्य करणार्‍या आरोपीला तात्काळ बेड्या ठोका अशी मागणी महिला संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.बीड तालुक्यातील येळंबघाट परिसरात काल दुपारी एक 20 वर्षीय तरूणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील 20 वर्षीय तरूणी विवाहित होती मात्र गेल्या काही दिवसांपासून ती पुणे येथे प्रियकरासोबत राहत होती. दि.13 नोव्हेंबर रोजी दोघेही पुण्याहून मोटारसायकलवरून गावी निघाले होते. दि.14 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास नेकनूर-केज रोडलगत तरूणाने मोटारसायकल थांबवली आणि तिला रस्त्याच्या बाजूला नेले. त्याठिकाणी तिच्यावर अ‍ॅसीड हल्ला केला. त्यानंतर पेट्रोल टाकून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. तरूणीला अर्धवट जळालेल्या अवस्थेत सोडून तो फरार झाला. पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत ती तरूणी जाग्यावरच तडफडत होती. रोडवरून जाणार्‍या वाहनधारकांना तिचा आवाज आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जावून पाहिले असता तरूणानी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. याची माहिती नेकनूर पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने तिला नेकनूर येथील कुटीर रूग्णालयातून पुन्हा रूग्णवाहिकेद्वारे जिल्हा रूग्णालयात दाखल केले. शनिवारी रात्रभर तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र 48 टक्के भाजल्याने तिच्या चेहर्‍यावर आणि अंगावर मोठ्या जखमा झाल्या होत्या. अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून आज सकाळी जिल्हा रूग्णालयात तिचा मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणात नेकनूर ठाण्याचे सपोनि. लक्ष्मण केंद्रे यांनी तरूणीचा मृत्युपुर्व जवाब घेतल्यानंतर अविनाश राजुरी (रा.शेळगाव, ता.देगलुर, जि.नांदेड) याच्याविरूध्द काल रात्री उशिरा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान माणुसकीला काळीमा फासणार्‍या घटनेने सर्वत्र खळबळ उडाल असून ऐन लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच एका सैतानी वृत्तीच्या तरूणाने तरूणीचा जीव घेतल्याने हळहळ व्यक्त होवू लागली आहे.डीवाएसपी सावंत यांच्यासह तरूणीचे नातेवाईक रूग्णालयात दाखलबीड तालुक्यातील येळंबघाट परिसरात अ‍ॅसीड हल्यानंतर पेट्रोल टाकून जाळलेल्या तरूणीचा आज सकाळी मृत्यू झाला. सदरील घटनेनंतर केज विभागाचे डीवायएसपी भास्कर सावंत यांनी आज सकाळी जिल्हा रूग्णालयात भेट दिली. यावेळी त्यांनी मयत तरूणीच्या नातेवाईकांकडूनही माहिती घेतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड