शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडीवर अत्याचार करून झाला होता पसार, पाच वर्षानंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

By गौरी टेंबकर | Updated: April 7, 2024 11:42 IST

या आरोपीची सध्या अधिक चौकशी गोराई पोलीस करत आहेत.

मुंबई : पाच वर्षापूर्वी ८ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून पसार झालेल्या राजा उर्फ राजेश महादू चोरगे (३०) नामक आरोपीला अटक करण्यात गोराई पोलिसांना यश मिळाले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी मोबाईलचा वापरत नव्हता तसेच स्वतःची ओळखही त्याने बदलली होती. मात्र, अखेर तो कायद्याच्या जाळ्यात अडकला.

बोरिवली पश्चिमच्या गोराई येथील जुईपाडा परिसरात २०२० मध्ये चोरगे राहायचा. त्याच्यासोबत पीडित मुलगीही तिच्या आजीसोबत राहायला होती. त्याने या मुलीवर अत्याचार केला. ही बाब घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी गोराई पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. याबाबत समजल्यानंतर चोरगे तिथून पसार झाला. तेव्हापासून गोराई पोलीस चोरगेच्या मागावर होते. परंतु तो त्याची ओळख लपवून व नावात बदल करून गोवा व पुणे परिसरात राहत असल्यामुळे सापडत नव्हता. लोकेशन समजू नये म्हणून त्याने मोबाईल वापरणेही बंद केले होते. चोरगेच्याबाबत कोणतीही माहिती गोराई पोलिसांकडे नव्हती. मात्र गेल्या एक महिन्यापासून गोराई पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय जाधव आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार महेश तिरोडकर, प्रशांत खोत आणि शिपाई विक्रम बाबर यांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक बाबींचे अवलोकन करत चोरगेचे पुण्यातील लोकेशन मिळवले. 

पोलीस उपायुक्त आनंद भोईटे आणि गोराई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदाकिनी नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव आणि त्यांच्या पथकाने पुण्यात दाखल होत दौंड येथील कासुर्डी टोलनाका परिसरातून चोरगेच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर यापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल असून त्यामध्ये देखील तो जामिनावर बाहेर होता. मात्र त्यानंतर तो कोर्टाच्या तारखांनाही हजर राहत नव्हता त्यामुळे त्याच्या विरोधात वॉरंट निघाले होते. दरम्यान गंभीर गुन्ह्यांतील या आरोपीची सध्या अधिक चौकशी गोराई पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी