शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मामा उडालाच! ३५ वर्षीय मामीचे भाच्यासोबत सूत जुळले; आधी लग्न केले मग सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 15:47 IST

दोघांच्याही कुटुंबीयांनी घरातीलच प्रकरण असल्याने दोघांनाही समजविण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लग्न करू नका असे सांगितले.

प्रेम आंधळे असते म्हणतात, परंतू कधी कधी ते नातेसंबंध देखील पाहत नाही. असाच एक प्रकार राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात घडला आहे. तरुण मामीचा भाच्यावर जीव जडला आणि नातेसंबंधांवर मोठा परिणाम झाला आहे. 

भाचा अल्पवयीन होता, तो नेहमी मामाकडे येत-जात होता. या दरम्यान ३५ वर्षीय मामीचे आणि त्याचे सूत जुळले. मामाला जेव्हा हा प्रकार समजला तोवर खूप उशीर झाला होता. अखेर हे मामी-भाच्याचे प्रेमप्रकरण पोलीस ठाण्यात गेले. हे प्रकरण बीनासरचे आहे.  मामाने पोलिसांत पत्नी आणि भाच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीनुसार त्याचे १० वर्षांपूर्वी नेशलच्या महिलेशी लग्न झाले होते. तिच्यापासून दोन मुलेदेखील आहेत. तर कारंगोला त्याची बहीण दिलेली आहे. तिचा मुलगा अल्पवयीन आहे. तो नेहमी घरी येत जात होता. यावेळी मामी आणि भाच्यात प्रेमसंबंध तयार झाले आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. 

काही दिवसांपूर्वीच पत्नीने भाच्यासोबत रहायला जाणार असल्याचे मामा असलेल्या पतीला सांगितले. तसेच भाच्यासोबत लग्न केल्याचेही ती म्हणाली. यामुळे मामाच्या डोळ्यासमोर अंधारी आली. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मामाने आपण पत्नीला घटस्फोट दिला नसल्याचे म्हटले आहे. यामुळे त्यांनी केलेले लग्न हे कायदेशीर नाही. 

दोघांच्याही कुटुंबीयांनी घरातीलच प्रकरण असल्याने दोघांनाही समजविण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लग्न करू नका असे सांगितले. तरीदेखील दोघेही एकत्र राहणार, संसार करण्यावर अडून राहिले. दोघेही एकत्र जगणार आणि मरणार असल्याचे मामीने स्पष्ट केले तसेच मामासोबत जाण्यास तिने नकार दिला. मामीचे वय ३५ वर्षे तर भाच्याचे वय १७ वर्षे आहे. यामुळे नातेसंबंध तर आहेत, पण कायदेशीर दृष्ट्या देखील हे लग्न योग्य नाहीय. यामुळे कुटुंबीयांसोबतच पोलीसही काय करावे या कोड्यात अडकले आहेत. गेल्यावर्षी बिहारमध्ये देखील असाच प्रकार घडला होता. तरुण मामीने भाच्यासोबत लग्न केले होते. 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टRajasthanराजस्थान