शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ॲड. प्रवीण चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात; एका गुन्ह्यात जामीन, दुसऱ्यात अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 06:36 IST

मोरे यांनी कट कारस्थान रचण्यासंदर्भात झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लीप सादर केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : खंडणीच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर न्यायालयीन आदेशानुसार तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण चाळीसगाव येथे विशेष तपास पथकासमोर रविवारी हजर झाले. मात्र, अन्य एका गुन्ह्यात न्यायालयाचे कुठलेही आदेश नसल्याचे स्पष्ट होताच जळगाव शहर पोलिसांनी रविवारी संध्याकाळी ॲड. चव्हाण यांना ताब्यात घेतले. 

नीलेश रणजीत भोईटे (रा. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून विजय भास्कर पाटील व किरणकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या चौकशीत साक्षीदार व पुण्यातील व्यावसायिक तेजस मोरे यांचा जबाब नोंदविण्यात आला होता. मोरे यांनी कट कारस्थान रचण्यासंदर्भात झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लीप सादर केली होती. त्यानंतर ॲड. प्रवीण चव्हाण यांना सहआरोपी करण्यात आले होते. ॲड. चव्हाणला जळगाव न्यायालयाने खंडणीच्या अन्य एका गुन्ह्यात जामीन मंजूर केला आहे.

जामीन मंजूर करताना या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या विशेष पथकासमोर हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ॲड. चव्हाण यांनी रविवारी सकाळी चाळीसगाव येथे हजेरी लावली. मात्र, ॲड. चव्हाण यांच्याविरोधात जळगाव शहर पोलिसातही अन्य एक गुन्हा दाखल आहे.  या गुन्ह्यासंदर्भात न्यायालयाचे कुठलेही आदेश नसल्याने हजेरीसाठी आलेल्या ॲड. चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले.