शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

ॲड. चव्हाणचे कारनामे ‘सीबीआय’ खोदणार! खंडणी प्रकरणासह दोन गुन्ह्यांचा तपास वर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 06:25 IST

बीएचआर पतसंस्थेतील गैरप्रकार व फसवणूकप्रकरणी डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मोक्काअंतर्गत तपासकामी झंवर यांच्या पुण्यातील फ्लॅटवर धाड टाकण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तत्कालीन सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी पोलिस अधिकाऱ्यांकरवी सूरज सुनील झंवर (जळगाव) यांच्याकडून १ कोटी २० लाखांची खंडणी वसूल केल्या प्रकरणासह अन्य एका गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवीण चव्हाण यांच्यासह पुण्यातील तपास अधिकारी सूचिता खोकले आता सीबीआयच्या रडारवर आल्या आहेत.

बीएचआर पतसंस्थेतील गैरप्रकार व फसवणूकप्रकरणी डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मोक्काअंतर्गत तपासकामी झंवर यांच्या पुण्यातील फ्लॅटवर धाड टाकण्यात आली होती. झंवर यांच्या लॅपटॉपमध्ये पुरावे, दस्तऐवजासह चाकू मिळाल्याचा दावा ॲड. चव्हाण व तपास अधिकारी खोकले यांनी पुणे न्यायालयात  केला  होता. त्यानंतर ॲड. चव्हाण यांनी झंवर यांना तपासकामी बोलावले होते आणि २२ जानेवारी २०२१ रोजी अटक करून १४ दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली होती. या १४ दिवसांच्या कोठडीत झंवर यांचा एकही जबाब नोंदविला गेला नाही. २८ मे रोजी झंवर यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना न्यायालयाने झंवर यांचा कुठलाही सहभाग दिसून येत नसल्याचे मत नोंदविले होते.

जामीन दिल्यानंतरही झंवर यांना जबाबासाठी बोलावत खंडणीनाट्य रचले गेले आणि उदय पवार (रा. चाळीसगाव) यांच्यामार्फत १ कोटी २० लाख रुपयांची खंडणी स्वीकारल्याची फिर्याद सूरज झंवर यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार जळगाव पोलिसांनी प्रवीण चव्हाण, मध्यस्थी उदय पवार, शेखर सोनाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ॲड. चव्हाण व सोनाळकर यांनी जळगाव न्यायालयाकडून जामीन मिळविला होता. त्यानंतर न्यायालयीन आदेशानुसार चव्हाण हजेरीसाठी पोलिसांसमोर आले होते. त्याचवेळी अन्य एका गुन्ह्यात चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. जवळपास महिनाभर कारागृहात असणाऱ्या चव्हाणांची सुटका झाली होती. या प्रकरणातील गांभीर्य ध्यानात घेऊन राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार, दि. २२ मे रोजी हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. 

त्याचाही शाेध घेणार n जळगावच्या विजय भास्करराव पाटील यांनी निंभोरा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल होता. n याप्रकरणात सुनील झंवर, नीलेश भाईटे यांच्यासह काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. n या गुन्ह्यातही ॲड. प्रवीण चव्हाण यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचाही तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. 

कुठलाही सहभाग आणि संदर्भ नसताना मला गोवण्यात आले. तपासात कुठलाही पुरावा सापडला नसताना पदाचा गैरवापर करून चव्हाण यांनी मानसिक व शारीरिक त्रास दिला. या प्रकरणात अनेकांच्या भूमिका संशयास्पद आहे. त्याचे गांभीर्य ओळखून हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.     - सूरज झंवर, फिर्यादी

टॅग्स :advocateवकिल