शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

बदलापुरात व्यसनी मित्राने केला मित्राच्या आईवर बलात्काराचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 21:06 IST

घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली असून न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे

बदलापूर - आपली मुलं चांगल्या संगतीत राहावी, याकडे प्रत्येकच पालकांचं लक्ष असतं. मात्र हीच गोष्ट बदलापुरात एका महिलेच्या जीवावर बेतली आहे. कारण मुलाच्या दारुड्या मित्राला आपल्या मुलासोबत न राहण्याची समज दिल्यानंतर त्याने चक्क मित्राच्या आईवर बलात्कार करण्याचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

बदलापूर पश्चिमेच्या बॅरेज रोडवरील रमेशवाडी भागात हा प्रकार घडला. या भागातील एका गृहसंकुलात पीडित महिला या त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचे पती आणि मुलगा असे दोघेही सरकारी नोकरी करतात. मात्र त्यांच्याच संकुलात राहणाऱ्या दिनेश गोल्हे नामक मुलाशी पीडित महिलेच्या मुलाची मैत्री होती. मात्र दिनेशला दारू पिण्याचं व्यसन असल्यानं या मैत्रीमुळे आपल्याही मुलाला नको त्या सवयी लागतील आणि तो वाया जाईल, अशी भीती सदर महिलेला होती. त्यामुळे त्यांनी दिनेशला आपल्या मुलासोबत राहू नको, अशी ताकीद दिली होती. मात्र याचा राग आल्यानं दिनेश याने बदला घ्यायचं ठरवलं आणि १२ डिसेंबर रोजी त्या घरी एकट्याच असताना त्यांच्या घरात घुसला. त्यानंतर त्याने त्या महिलेला यांना जाब विचारत त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेने त्याला विरोध केल्यानं त्याने थेट चाकूने त्यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार चुकवण्यासाठी महिलेने यांनी हात मध्ये टाकला असता दिनेश याने त्यांच्या हातावर वार केले. यावेळी सदर महिलेने आरडाओरडा केल्यानं जिन्यात कचरा गोळा करत असलेल्या सफाई कामगार महिलेने सोसायटीच्या लोकांना गोळा केलं आणि दिनेश तिथून पळून गेला.

या घटनेनंतर पोलिसांनी काही तासातच दिनेशला अटक केली असून न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पीडित महिलेवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं असलं, तरी त्या मानसिक धक्क्यातून अद्याप सावरलेल्या नाहीत

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbadlapurबदलापूरthaneठाणे