शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

अभिनेत्रीचे अश्लील फोटो झाले व्हायरल, आरोपीला धाराशिवमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 08:31 IST

पुढील तपासासाठी वर्सोवा पोलिस ठाण्यात  आणले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई : सोशल मीडियावर अभिनेत्रीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीला धाराशिव परिसरातून अटक करण्यात आली. संजय शालगर (३४) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पुढील तपासासाठी वर्सोवा पोलिस ठाण्यात  आणले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा आरोपी धाराशिव परिसरात असल्याची माहिती वर्सोवा पोलिसांना फेसबुक, इंस्टाग्राम, तसेच तक्रारदाराच्या मोबाइल विश्लेषणातून समजली. तो मूळचा पुण्याचा रहिवासी असून, वर्सोवा पोलिसांचे पथक पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय आणि वर्सोवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर, त्याला ताब्यात घेण्यात आले. 

मॉर्फ फोटोबाबत मित्राकडून कळलेस्थानिक न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला मुंबईत आणले जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपीने पीडितेचे मॉर्फ फोटो तिच्या पालकांना, मित्रांना आणि नातेवाइकांना त्यांच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठविले आहेत. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली जाईल, असे सोशल मीडियावर संदेश आल्यानंतर बुधवारी वर्सोवा पोलिसांत गुन्हा दाखल केला. पीडित दोन वर्षांपासून तिच्या मैत्रिणीसोबत अंधेरीत राहते. तिला २७ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या मॉर्फ फोटोबाबत मित्राकडून कळले. त्यानुसार, तिने वर्सोवा पोलिसांच्या सायबर विभागाकडे इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) पत्ता मागविला असून, या प्रकरणी आरोपीवर भादंवि कलमासह आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी