शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानात अभिनेत्रीसोबत छेडछाड; उद्योजकाला अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 16:03 IST

दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानात एका अभिनेत्रीसोबत छेडछाड केल्याच्या आरोपात गाझियाबादमधील एका उद्योजकाला अटक करण्यात आली आहे

दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानात एका अभिनेत्रीसोबत छेडछाड केल्याच्या आरोपात गाझियाबादमधील एका उद्योजकाला अटक करण्यात आली आहे. पीडित अभिनेत्रीनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार ३ ऑक्टोबर रोजी दिल्लीहून मुंबईत येत असताना विमान प्रवासात संबंधित व्यक्तीनं छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. 

अभिनेत्रीच्या दाव्यानुसार, विमान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच जेव्हा ती तिची बॅग ओव्हरहेड स्टोरेजमधून बाहेर काढण्यासाठी उठली त्यावेळी संबंधित व्यक्तीनं चुकीच्या पद्धतीनं तिला स्पर्श केला. अभिनेत्रीनं तातडीनं याबाबत केबिन क्रूकडे तक्रार केली आणि त्या व्यक्तीलाही सुनावलं. केबिन क्रूनं संबंधित प्रकरणी अभिनेत्रीला पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितलं. त्यानंतर अभिनेत्रीनं वर्सोवा पोलीस ठाणे गाठलं तिथं पोलिसांनी तिला सहारा एअरपोर्ट पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितलं. 

अभिनेत्रीचा संताप पाहून आरोपीनं मागितली माफीअभिनेत्रीनं संताप व्यक्त करता आरोपीनं तिची माफी मागितली होती. याचीही पुष्टी केबिन क्रूनं केली आहे. विमानाच्या केबिन क्रूनंही अभिनेत्रीच्या तक्रारीची माहिती सहारा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिली आहे. प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी नितीन नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर सोमवारी आरोपीला अटक करण्यात आली आणि कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं आरोपीला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. आरोपीनं केबिन क्रूची दिशाभूल करण्यासाठी आपल्या नावाचा उच्चार देखील चुकीच्या पद्धतीनं केला होता, असंही चौकशीत निष्पन्न झालं आहे. त्यानं याआधी आपलं नाव राजीव असं सांगितलं होतं. 

केबिन क्रूनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून सुरुवातीला राजीव नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला जात होता. पण पोलिसांना संशय आल्यानंतर त्यादिवशी प्रवास केलेल्या सर्वच प्रवाशांची माहितीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर आरोपीचं खरं नाव नितीन असल्याचं उघड झालं. नितीन याचा फोटो पोलिसांनी अभिनेत्रीला दाखवला आणि आरोपीची ओळख पटली. १४ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी नितीन याला चौकशीसाठी बोलावलं. काही तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी नितीन याला अटक केली आहे. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार नितीन गाझियाबादमधील एक मोठा उद्योजक असल्याची माहिती समोर आली आहे. व्यवसायासंदर्भात त्याचं मुंबईत येणं-जाणं असतं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई