शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीच्या मुलाची हत्या! क्रिकेटमध्ये मैत्री, नशेच्या विळख्यात अडकला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:12 IST

रविवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये सागरचा मृतदेह अनुज आणि सनी दोघे खेचून घेऊन जात असल्याचे दिसले. 

बरेली - क्राइम पेट्रोल आणि माटी की बन्नासारख्या टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री सपना सिंहच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. एका नाल्यात संशयस्पाद अवस्थेत सपना सिंह यांच्या मुलाचा मृतदेह सापडला. १४ वर्षीय सागरच्या मृत्यूमुळे सपना सिंह यांना मोठा धक्का बसला आहे. सागरची हत्या करण्यात आली असून त्याला न्याय द्यावा अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे. 

पोलिसांनी या प्रकरणी २ मित्रांना अटक केली आहे. सपना सिंह यांनी मुलाच्या मृत्यूनंतर दीड तासाहून अधिक काळ  बरेली येथे आंदोलन केले, त्यानंतर मुलाच्या मारेकऱ्यांना शिक्षा देऊ असं आश्वासन पोलीस प्रशासनाने त्यांना दिले. सागरच्या हत्येच्या आरोपात त्याचे मित्र अनुज आणि सनी यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची रवानगी जेलमध्ये केली आहे. नशेच्या ओव्हर डोसमुळे सागरचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नेमकं मृत्यू का झाला यासाठी विसरा नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. 

रिपोर्टनुसार, तपासात अनुज आणि सनीने सागरसोबत ड्रग्स आणि दारू प्यायल्याचे कबुल केले. ओव्हर डोसमुळे सागर बेशुद्ध पडला, त्यानंतर आम्ही घाबरलो आणि त्याला फरफटत एका शेताकडे नेले तिथे सोडून पळून गेलो असं मित्रांनी सांगितले. ८ वी शिकणारा सागर बरेलीच्या आनंद विहार कॉलनीत त्याच्या मामासोबत राहायचा. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये सागरचा मृतदेह अनुज आणि सनी दोघे खेचून घेऊन जात असल्याचे दिसले. त्यानंतर तातडीने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. 

सागर वाईट मित्रांच्या संगतीत होता. त्याला क्रिकेट खेळण्याची आवड होती, तेव्हा अनुज आणि सनीसोबत त्याची मैत्री झाली. हे दोघेही बिघडलेले होते. दोघं ड्रग्स सेवन करायचे. सुरुवातीला या दोघांनी स्वखर्चाने सागरला ड्रग्स दिले, त्यानंतर सागरच्या पैशावर दोघे ड्रग्स सेवन करत होते. हे दोघे पदवीधर होते तर सागर अल्पवयीन होता. अनुजचे वडील पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत त्यामुळे सागरचा मृत्यू ड्रग्सच्या अतिसेवनामुळे झाल्याचं सांगून आरोपींना सोडणार होते. परंतु माझ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे असा दावा अभिनेत्री सपना सिंह यांनी करत आंदोलन केले त्यामुळे हे प्रकरण चिघळले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी