शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता करण ओबेरॉयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 06:47 IST

ज्योतिषी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी टेलिव्हिजन कलाकार तसेच अँकर करणसिंह भूपेंद्रसिंह ओबेरॉय (४७) याला सोमवारी अटक करण्यात आली होती.

मुंबई : ज्योतिषी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी टेलिव्हिजन कलाकार तसेच अँकर करणसिंह भूपेंद्रसिंह ओबेरॉय (४७) याला सोमवारी अटक करण्यात आली होती. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याचे ओशिवरा पोलिसांकडून सांगण्यात आले.३८ वर्षीय महिलेवर बलात्कार करत त्याचा व्हिडीओ ओबेरॉयने बनवला. त्याचा वापर करत तो तिला पैसे आणि शारीरिक सुखाची मागणी करत ब्लॅकमेल करत होता. अखेर त्याच्या छळाला कंटाळून तक्रार दाखल करत आहोत, असे तक्रारीत नमूद करत या प्रकरणी तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर ओबेरॉयवर गुन्हा दाखल करत ६ मे रोजी पोलिसांनी त्याला अटक केली.त्याला स्थानिक न्यायलालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.कोठडीचे मुदत संपल्यानंतर ओबेरॉयला गुरुवारी पुन्हा स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी या प्रकरणाची अधिक तपासणी करण्याकरिता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.या प्रकरणी ओबेरॉय हा शुक्रवारी सत्र न्यायालयात अर्ज करणार असल्याचे त्याचे वकील दिनेश तिवारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.ओबेरॉयने जस्सी जैसी कोई नहीं, स्वाभिमान, छाया, निर्देश, जीवन बदल सकता है, हादसा, इनसाइड एज, रॉसवेल, न्यू मेक्सिको अशा विविध मालिकांमधून काम केले आहे. याशिवाय टायटन अंताक्षरी आणिद ग्रेट इंडियन कॉमेडी शो या रिअ‍ॅलिटी शोसाठी त्याने अँकरिंगदेखील केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी