शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट सेवा केंद्र भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई; दीड कोटीची रोकड, डायऱ्या दलालांकडून जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 05:58 IST

या प्रकरणी सीबीआयने १४ पासपोर्ट अधिकाऱ्यांसह ३२ जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत १२ गुन्हे दाखल केले

मुंबई - मुंबईतील लोअर परळ आणि मालाड येथील पासपोर्ट सेवा केंद्रातील (पीएसके) भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) शोधमोहीम सुरू आहे. या झाडाझडतीदरम्यान एका दलालाकडून एक कोटी ५९ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 

सीबीआयच्या अधिकाऱ्यांसह दक्षता विभागाचे अधिकारी आणि विभागीय पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी २६ जूनला परळ व मालाड येथील पासपोर्ट सेवा केंद्रांची अचानक तपासणी केली. यावेळी संशयित अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची आणि मोबाइलचीही तपासणी करण्यात आली. कार्यालयातील कागदपत्रे, सोशल मीडियावरील संदेश आणि यूपीआय आर्थिक व्यवहारांचीही तपासणी करण्यात आली. त्यात संबंधित अधिकारी आणि दलाल यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे आढळले. दलालांचे काम करण्याच्या बदल्यात हे व्यवहार झाल्याचा संशय आहे.

या प्रकरणी सीबीआयने १४ पासपोर्ट अधिकाऱ्यांसह ३२ जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत १२ गुन्हे दाखल केले. या प्रकरणी पारपत्र सेवा केंद्रांवरील पारपत्र सहायक आणि दलाल यांच्याशी संबंधित नाशिक आणि मुंबईतील ३३ ठिकाणी सीबीआयने शोधमोहीम राबवून महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. पासपोर्ट अधिकारी अवघ्या दोन ते तीन हजारांतही दलालांशी हातमिळवणी करून त्यांना पासपोर्ट सेवा पुरवत होते, असे निष्पन्न झाले आहे. 

अधिकारी-दलाल लागेबांधे सीबीआयने ३० ते १ जुलैदरम्यानही संशयितांच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या. त्यात एका पीएसके दलालाचे घर आणि कार्यालयाची झडती घेण्यात आली. यावेळी एक कोटी ५९ लाखांची रोकड आणि पाच डायऱ्या तसेच काही तांत्रिक पुरावे सीबीआयच्या हाती लागले आहेत. या प्रकरणात काही भ्रष्ट पासपोर्ट अधिकाऱ्यांचे दलालांशी असलेले लागेबांधे उघड होत आहेत.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारpassportपासपोर्टCBIगुन्हा अन्वेषण विभाग