शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ॲक्शन प्लॅन, शहरांत दोन तर ग्रामीण भागात १० किमी परिघात नवे पोलिस ठाणे

By नारायण जाधव | Updated: August 31, 2023 06:40 IST

सध्या एखादा गुन्हा घडल्यास तक्रारीसाठी पीडितांना लांबवर धाव घ्यावी लागते. यात त्यांचा बराच वेळ, श्रम, पैसा वाया जातो.

नवी मुंबई : राज्यातील वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरणासह जीवनमान पद्धतीत झालेला बदल, त्यानुसार गुन्ह्यांचे  बदलेले स्वरूप, सोशल मीडियाचा समाजात वाढलेला प्रसार आणि वापर, त्या माध्यमातून होणारे सामाजिक, धार्मिक गुन्हे, त्याचे समाजात उमटणारे पडसाद, इंटरनेटद्वारे होणारे आर्थिक फसवणुकीचे वाढते गुन्हे लक्षात घेऊन राज्याच्या गृह विभागाने पोलिस ठाण्यांच्या निर्मितीसाठी नवी नियमावली तयार केली आहे. 

यानुसार शहरी भागात दोन ते चार किमी तर ग्रामीण भागात चार ते दहा किमीच्या परिघात आता नवे पोलिस ठाणे असणार आहे. तसेच मोठी देवस्थाने, धार्मिक यात्रा भरणारी गावे, शहरे, सेझ येथेही नवे पोलिस ठाणे असेल, नव्या पोलिस ठाण्यांच्या निर्मितीमुळे गुन्हेगारीला अटकाव बसेल, असा विश्वास गृह विभागाने व्यक्त केला आहे. ही नवी नियमावली गेल्या  आठवड्यात जाहीर केली आहे. 

सध्या एखादा गुन्हा घडल्यास तक्रारीसाठी पीडितांना लांबवर धाव घ्यावी लागते. यात त्यांचा बराच वेळ, श्रम, पैसा वाया जातो.  याशिवाय पोलिसांना तपासात अनेक अडचणी येतात. मात्र, आता घरापासून जवळच पोलिस ठाणे असल्यास तक्रारदारांना न्याय  मिळणे आणि गुन्हेगारांना पकडणेही सोपे होणार आहे.

तीन वर्षांतील गुन्ह्यांची नोंद इतकी हवीभाग एक ते पाचमधील भादंविमधील गुन्ह्यांची सरासरी १५० पेक्षा असावी, तसेच भाग सहासह स्थानिक कायद्यांतील गुन्ह्यांची सरासरी २०० पेक्षा जास्त असावी.

हे आहेत नव्या पोलिस ठाण्यासाठी निकष- लोकसंख्येची घनता विशेष भौगोलिक स्थान, पर्यटन स्थळ अशा ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाणे असावे.- शरीराविरुद्ध व संपत्तीविषयी पारंपरिक गुन्ह्यांचे प्रमाण जिथे जास्त आहे.- आर्थिक गुन्हे, बँकांची फसवणूक, चोऱ्या, दरोड्यांचे प्रमाण जिथे जास्त आहे.- ज्या ठिकाणी वाहनांची संख्या मोठी आहे, वारंवार वाहतूककोंडी होते, अपघात होतात, अशा ठिकाणी वाहतूक पोलिस चौकी असावी.- सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणी जसे शैक्षणिक संस्था, हॉस्टेल, न्यायालये, धार्मिक स्थळे, बसस्थानके, अणुऊर्जा प्रकल्प, ऊर्जा प्रकल्प, मोठी धरणे, खेळाचे मोठे स्टेडियम- सामाजिक स्तरावरील गुन्हे, जसे अनुसूचित जाती/अनु. जमाती/गतिमंद, दिव्यांग, महिला यांच्यावर ज्या ठिकाणी अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे.   - अमली पदार्थांचे सेवन, विक्री, लहान मुलांसाेबत होणारे गुन्हे- डायल ११२ वर ज्या ठिकाणावरून जास्त प्रमाणात मासिक काॅल येतात अशी ठिकाणे- सायबर गुन्ह्यांचे प्रमाण जिथे जास्त आहे.- मानवी तस्करीसह शरीरविक्रीचे व्यवसाय करणारी ठिकाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी