शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १५ किलो गांजासह एका इसमास अटक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 17:27 IST

ऑटो रिक्षातून १५ किलो गांजा घेऊन जाणाऱ्या इसमाला भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी: ऑटो रिक्षातून १५ किलो गांजा घेऊन जाणाऱ्या इसमाला भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या इसमाकडून २ लाख ३० हजार ४०० रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त करून आरोपीस अटक केली आहे. 

भिवंडी गुन्हे शाखा युनिट-२ च्या पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने रांजणोली गांव, कमानीचे रोडवर एका अॅटो रिक्षातुन प्रवासी म्हणुन एक इसम गांजा हा अमली पदार्थ विक्री करीता घेवुन जात असल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी छापा मारला असता दुर्गा राजेंद्र साह वय ४७ वर्षे, रा. रांजणोली, मुळगांव बिहार यास ताब्यात घेत त्याच्याकडून दोन निळया रंगांच्या प्लास्टिक पिशामधुन एकुण वजन १५.३६ कि.ग्रॅम वजनाचा व २,३०,४०० रु किमतीचा मानवी शरीरावर परिणाम करणारा गांजा हा अमली पदार्थ, रोख रक्कम, मोबाईल फोन असा एकुण २,४१,५३० रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. 

याप्रकरणी कोनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत सपोनि विजय मोरे, सपोनि प्रफुल्ल जाधव, पोउपनिरी रमेश शिंगे, सपोउनि रामसिंग चव्हाण, सपोउनि हनुमंत वाघमारे, सपोउनि रविंद्र पाटील, पोहवा मंगेश शिर्के, पोहवा राजेंद्र चौधरी, पोहवा रामचंद्र जाधव, पोना सचिन जाधव, पोना साबिर शेख, पोना  रंगनाथ पाटील, पोकॉ प्रशांत निकुंभ अंमली पदार्थ विरोधी पथक, ठाणे यांनी केलेली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhiwandiभिवंडी