शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील सावनेरात महिला डॉक्टरवर अ‍ॅसिड हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 20:04 IST

हिंगणघाट जळीत प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असताना नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे महिला डॉक्टरवर अ‍ॅसिड फेकण्याची घटना गुरुवारी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देडॉक्टरसह तिघी जखमीजखमींमध्ये शालेय विद्यार्थिनीचा समावेश दारुड्या युवकाचे कृत्य, नागरिकांनी दिला चोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (सावनेर) : हिंगणघाट जळीत प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असताना नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे महिलाडॉक्टरवर अ‍ॅसिड फेकण्याची घटना गुरुवारी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात महिलाडॉक्टरसह अन्य दोघी जखमी झाल्या असून, जखमींमध्ये शालेय विद्यार्थिनीचा समावेश आहे. घटना घडताच परिसरातील नागरिकांनी आरोपीस पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. शिवाय, संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत पोलीस ठाण्याच्या आवारात निदर्शने केली.

मिलिंद अशोक कन्हेरे (२२) रा. तेलंगखेडी, ता. सावनेर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तिन्ही जखमींना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती केले आहे. जखमी डॉक्टर ही नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापिका आहेत.नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पथक गुरुवारी नॅशनल एड्स कन्ट्रोल ऑर्गनायझेशन (नॅको) या प्रोजेक्टकरिता सर्वेक्षण करण्यासाठी सावनेर येथे आले होते. यात तीन महिला डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकाचा समावेश होता. सावनेर शहरातील पहलेपार परिसरातील झोपडपट्टी भागात सर्वेक्षण करण्यासाठी त्यांनी दोन टीम करून सर्वेक्षण करायला सुरुवात केली.पहिली टीम कैकाडी महाराज मंदिराजवळ उभी असताना आरोपी मिलिंद तिथे आला. तो दारू प्यायला होता. त्याने डॉक्टरांना ‘तेरा चेहरा खराब कर दूंगा’ असे म्हणत बाटलीतील अ‍ॅसिड त्यांच्या दिशेने फेकले. मात्र, डॉक्टरांनी लगेच पळ काढत जवळच्या झोपडीत आश्रय घेतला. काही वेळातच दुसरी टीम त्या मंदिराजवळ पोहोचली. काही वेळाने तो परत तिथेच आला आणि ‘तेरा चेहरा खराब कर दूंगा’ म्हणत त्यांच्या दिशेने बाटलीतील अ‍ॅसिड फेकले. त्यात महिला डॉक्टरच्या हात व पाय, त्यांच्यासोबत असलेल्या महिला रुग्णाच्या चेहरा तसेच बाजूला उभ्या असलेल्या शालेय विद्यार्थिनीच्या गळ्यावर अ‍ॅसिड पडल्याने त्या भाजल्या. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला. एवढेच नव्हे तर, त्यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याने फेकलेले अ‍ॅसिड टॉयलेटसाठी वापरले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्याला डॉक्टरांनी दुजोरा दिला आहे. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी भादंवि ३०७, ३२६ (ब) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.पोलीस ठाण्यात तणावया घटनमुळे नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी रेटून धरली. शिवाय, गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकाराची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी सावनेर गाठले. त्यांनी घटनाक्रम जाणून घेतला. शिवाय, शीघ्रगती कृती दलासह अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली होती. दरम्यान, अनुचित प्रकार घडला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरWomenमहिला