शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीला घाटंजीतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 22:28 IST

Crime news: शहर गुन्हे शाखेची धाडसी कारवाई, आरोपी गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात

अमरावती : खूनाच्या गुन्ह्यात अमरावती मध्यवर्ती कारवागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याला उपचाराकरीता कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र येथून तो संधी साधून पळून गेला होता. सदर आरोपीला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथून बुधवारी अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.शेख सलमान शेख अहमद कुरेशी (२५, रा. कळ रोड रहीमनगर, यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे.

त्याला यवतमाळ शहर येथील खूनाच्या गुन्ह्यामध्ये २० ऑगस्ट २०२० रोजी जन्मठेपेची शिक्षा झाल्याने तो अमरावती कारागृहात शिक्षा भोगत होता. जेलबंद असताना त्याला कोरोनाची बाधा झाल्याने त्याला २० जानेवारी २०२१ रोजी येथील सुपर स्पेशालिटीतील कोविड रूग्णालयात उपचाराकरीता ठेवण्यात आले होते. मात्र त्याने येथून २८ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ९ च्या सुमारास पळ काढला. त्याच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसानी भादविची कलम २२४ नुसार गुन्हा नोंदवून त्याचा पथकाव्दारे शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करीत असताना आरोपी हा घाटंजी येथे असल्याचे माहिती मिळाली. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या नेतृत्वात पीएसआय राजकिरण येवले, पोलीस हवालदार राजु आप्पा बाहेनकर, गजानन ढेवले, दिनेश नांदे, निवृत्ती काकड, चालक प्रशांत नेवारे यांच्या पथकाने आरोपीस घाटंजी येथून शिताफीने अटक केली. 

कसा पळाला गुन्हेगार?सदर गुन्हेगार हा कोविड वार्डाच्या बाथरूमच्या खिडकीमधून पाईपव्दारे खाली उतरून त्याने पलायन केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले. त्यानंतर त्याने बडनेरा, भुसावळ, नागपूर व नंतर घाटंजी येथे तो आला. असे आरोपीने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले. पोलिसांच्या सदर धाडसी कारवाईचे कौतूक होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस