शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  शेतकऱ्याला लुटणारे आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 23:13 IST

चाकूच्या धाकावर शेतकऱ्याला लुटणाऱ्या एका कुख्यात गुंडाच्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या १२ तासात छडा लावला. दोघांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीन असल्यामुळे तिघांना ताब्यात घेऊन त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली.

ठळक मुद्देदरोड्याचा गुन्हा : १२ तासात छडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चाकूच्या धाकावर शेतकऱ्याला लुटणाऱ्या एका कुख्यात गुंडाच्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या १२ तासात छडा लावला. दोघांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीन असल्यामुळे तिघांना ताब्यात घेऊन त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली.भिलगाव येथील शेतकरी अरुण कवडूजी महाकाळकर (वय ५४) पहाटेच शेतात जाऊन भाजीपाला तोडतात आणि तो विकण्यासाठी ते भल्या सकाळी कळमना मार्केटमध्ये पोहचतात. नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास ते दुचाकीने जात असताना ऑटोमोटिव्ह चौक ते चिखली चौकादरम्यान दोन दुचाकींवर असलेल्या पाच आरोपींनी रोखले. त्यांना चाकूचा धाक दाखवून धक्काबुक्की करीत त्यांच्याकडची रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून आरोपी पळून गेले. लुटमारीमुळे व्यथित झालेल्या अरुण महाकाळकर यांनी कळमना मार्केट गाठले. तेथे दिवसभर भाजीपाला विकला अन् सायंकाळी यशोधरानगर पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील आरोपींचे वर्णन शहरातील अन्य पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. ते ऐकून कोतवाली ठाण्यातील पोलीस पथकाने गुन्हेगाराशी मिळत्याजुळत्या वर्णनाच्या एका संशयिताला काही वेळेतच ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देऊन जरीपटका तसेच खापरखेड्यातील साथीदारांची नावेही सांगितली. त्यानुसार पोलिसांनी आणखी तिघांना ताब्यात घेतले. त्यातील अभिजित नितीन नितनवरे (वय २१, रा. गौतमनगर, जरीपटका) तसेच आशिष ऊर्फ बाबू प्रेमसिंग (रा. खापरखेडा) या दोघांनाही अटक केली.म्होरक्या सराईत गुन्हेगारया टोळीचा म्होरक्या आरोपी नितनवरे आहे. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीचे १७ गुन्हे दाखल आहेत. गुन्हा केल्यानंतरही तो बिनधास्त फिरत होता. गुन्ह्याची तक्रार मिळाल्याच्या १२ तासात त्याच्या आणि साथीदारांच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी परिमंडळ ५ चे उपायुक्त नीलोत्पल, सहायक आयुक्त कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे ठाणेदार डी. बी. भोसले, डीबीचे सहायक निरीक्षक एन. व्ही. निस्वादे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जरीपटका ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कामगिरी बजावली.

टॅग्स :FarmerशेतकरीRobberyचोरीArrestअटक